अलीकडेच विराट कोहली याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो त्याच्या हॉटेल रूमचा आहे. त्याच्या खोलीत काय आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये बाथरूमपासून कपाटापर्यंत ठेवलेले सामान दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विराट कोहली याने नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता अनुष्का शर्मा हिनेही विराटचा व्हिडिओ त्याच्या संमतीशिवाय बनवून शेअर केल्याबद्दल संताप व्यक्त केला.
अभिनेत्री अनुष्का (anushka sharma) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक नोट शेअर करत लिहिले की, “अनेकवेळा अशा घटनांना सामोरे जावे लागले जेथे चाहत्यांनी सहानुभूती दाखवली नाही. पण, ही आतापर्यंतची सर्वात वाईट गोष्ट आहे. एक माणूस आणि जो कोणी त्याकडे पाहतो आणि विचार करतो ‘सेलिब्रेटी आहे! तेव्हा या सगळ्यासाठी तयार राहावे लागते.’ म्हणजे तुम्हीही या समस्येचा भाग आहात, हे तुम्हाला कळायला हवे.”

अनुष्काने पुढे लिहिले, “थोडा आत्म-नियंत्रण अभ्यास केल्याने प्रत्येकाला मदत मिळते. कल्पना करा तुमच्या बेडरूममध्येही असे काही घडत असेल तर?”
View this post on Instagram
अनुष्का शर्माची ही पोस्ट सध्या साेशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री आणि क्रिकेटरच्या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. युजर्सचे म्हणणे आहे की, “त्यांच्या संमतीशिवाय अशा प्रकारे एखाद्याच्या खोलीचा व्हिडिओ काढणे अत्यंत चुकीचे आहे.”
भारतीय क्रिकेट संघ पर्थमध्ये आहे आणि सोशल मीडिया युर्जस हा व्हिडीओही इथल्याच असल्याचा अंदाज लावत आहेत. ICC T20 विश्वचषक 2022 चा गट-2 यांचा सामना 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संपली प्रतीक्षा! ‘पुष्पा: द रूल’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर
‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक बनणार नाही! रिषभ शेट्टीने सांगितलं ‘हे’ मोठं कारण