नव्वदच्या दशकात दूरदर्शन चॅनेलवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका म्हणजे शक्तिमान. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना या मालिकेने वेड लागले होते.
मुकेश खन्ना यांनी हे पात्र अत्यंत काळजीपूर्वक निभावून सगळ्यांचे मनोरंजन केले होते. त्या काळात टेक्नॉलॉजीचा एवढा विकास झाला नव्हता किंवा विकासाचा तो पहिला टप्पा होता. त्याकाळी शक्तिमान पहिला सुपरहिरो होता, जो टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठेही उडू शकत होता.
एक वेगळ्या प्रकारचा हा शो बघितल्यामुळे सगळ्याच मुलांना आनंद होत असत. अनेक मुले शक्तिमान सारखे गोल गोल फिरून उडण्याचा प्रयत्न देखील करताना दिसली आहे. परंतु ही मालिका चालू असताना अनेक वेळा सूचना दिली जात होती की, याचे अनुकरण कृपया कोणी करू नये.
मुकेश खन्ना यांना देखील त्यावेळी थोड्याफार उंचीवरून खाली उडी मारावी लागायची. त्यांनी याबाबत एकदा शंभर फूट उंचीवरून खाली पडण्याचा एक अनुभव शेअर केला आहे.
मुकेश खन्ना यांनी शक्तिमान या मालिकेबद्दल बातचीत करताना, त्यांच्या शूटिंगच्या दरम्यान एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करून मुकेश खन्ना यांनी अशी कॅप्शन दिले आहे की, “शक्तिमान घायाळ.”
यासोबतच त्यांनी सांगितले की, “ते जेव्हा शक्तिमान या मालिकेचे शूटिंग करत होते. त्यावेळी त्यांना 100 फुटांवरून खाली उडी मारावी लागली. त्यावेळी त्यांचा पाय घसरला होता, आणि ते जमिनीवर पडले. एवढेच नाही तर त्यांच्या पायाचे एक हाड देखील मोडले होते.
शक्तिमान ही मालिका सुरू झाल्यानंतर त्यांना एका जाहिरातीचे चित्रीकरण करायचे होते. त्या जाहिरातीमध्ये काही स्टंट होते. या स्टंटचे दिग्दर्शक श्याम कौशल हे होते. ज्यांनी शक्तिमान या मालिकेतील स्टंटचे दिग्दर्शन केले होते. त्यावेळी मला एका तारेला बांधले जायचे, आणि क्रेनवर नेऊन मी हवेत उडत असायचो.
तिथेजवळपास सहा व्यक्ती त्या तारेला पकडुन उभ्या असायच्या. आणि शूटिंग झाल्यानंतर मला सुरक्षित खालीदेखील आणायच्या. परंतु एकदा या शॉर्टचा सराव करताना, मी तारेच्या मदतीने क्रेनच्या वर गेलो. मी जमिनीवर पडलो आणि माझ्या पायाचे हाड तुटले. त्यानंतर अनेक दिवस मी व्हिलचेअरवरच होतो.
सगळ्या लहान मुलांच्या आवडत्या शक्तिमान या मालिकेचे निर्माते स्वतः मुकेश खन्ना हेच होते. तर, दिनेश जानी या मालिकेचे दिग्दर्शक होते.