हनी सिंग हे नाव काढल्यानंतर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते त्याचे धमाकेदार रॅप सॉंग्स आणि ठेका धरायला लावणारी दमदार गाणी. हनी सिंगने त्याच्या गाण्यांनी आणि त्याच्या रॅप सॉंग्सने प्रेक्षकांना खासकरून तरुणाईला वेड लावले आहे. त्याची लोकप्रियता आणि प्रसिद्धी बघता सर्वच निर्माता दिग्दर्शकांनी हनी सिंगचे चित्रपटात एक तरी असावे असा आग्रह धरायला सुरुवात केली. हनी सिंग आणि हिट हे समीकरण देखील त्याने तयार केले आहे. असा हा व्यावसायिक आयुष्यात तुफान गाजणार सिंग वैयक्तिक आयुष्यात मात्र आता चांगलाच गाजत आहे.
यो यो हनी सिंगविरुद्ध त्याची पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्या पत्नीने त्याच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. शालिनीने केलेल्या तक्रारीमध्ये हनी सिंगने तिला मारहाण केली, लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. हनीबरोबरच त्याचे आई-वडिल आणि बहिणीच्याविरोधातही मारहाण करणे, छळ करणे आणि शोषण केल्याचे आरोप केले आहेत.
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम,’ अंतर्गत याचिका शालिनीने दाखल केली आहे. न्यायालयाने हनी सिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून २८ ऑगस्ट पर्यंत उत्तर मागितले आहे. या न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांच्यासमोर हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने तक्रार दाखल केली. हनी सिंगच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी त्याला नोटिस बजावली आहे. शिवाय हनी सिंगला त्याच्या पत्नीसोबतच्या संयुक्त मालकीच्या मालमत्ता विक्रीपासूनही थांबण्यात आले असून, तिचे सर्व दागिने देखील कोर्टात सादर करायचे आहे.
शालिनीने सांगितले की, “हनी सिंगने कधीच त्याच्या लग्नाला महत्व दिले नाही. तो कधीच त्याच्या लग्नाची अंगठी देखील घालत नाही. एकदा मी आमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यावरून तो खूप चिडला आणि त्याने मला खूप मारहाण देखील केली. ‘ब्राउन रंग’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्याने त्यांच्या टीममधल्या एका मुलीसोबत शारीरिक संबंध देखील ठेवले होते. ”
हनी सिंग आणि शालिनी यांचे लग्न २०११ मध्ये दिल्लीतील गुरुद्वारामध्ये झाले होते. २०१४ मध्ये, रियॅलिटी शो ‘इंडियाज रॉकस्टार’च्या माध्यमातून पहिल्यांदा हनी सिंहने त्याच्या पत्नीची शालिनीची जगासमोर ओळख करून दिली होती. हनी सिंहची पत्नी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. मधल्या काही काळात हनी सिंग दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता. हे व्यसन सोडवण्यासाठी त्याने व्यसनमुक्ती केंद्र देखील गाठले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’