सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य लोकांसोबतच कलाकार देखील त्यांच्या आप्तस्वकीयांसाठी पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना दिसतात. कलाकारांच्या या पोस्ट देखील इतर सर्व पोस्ट प्रमाणे तुफान व्हायरल होतात. अभिनेता शाल्व किंजवडेकरने त्याच्या इंस्टाग्राम आकुतवरून एका पोस्ट शेअर केली असून, अल्पावधीतच खूप व्हायरल होताना दिसत आहे.
झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या खूपच चर्चेत आली आहे. मालिकेचे कथानक आणि मालिकेत दिसणारे नवे चेहरे यांमुळे ही मालिका खूपच गाजत आहे. या मालिकेत ओम ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर हा नवा चेहरा कमी काळात खूपच लोकप्रिय झाला आणि अनेक तरुणींचे त्याने मनं जिंकले. त्याच्या लुक्सवर अनेक तरुणी भाळल्या मात्र शाल्व आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहे. नुकतीच त्याने त्याचं इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने त्याची गर्लफ्रेंड असलेल्या श्रेया डफळापूरकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाल्वने श्रेयासोबत त्याचे काही फोटो आणि श्रेयाचे काही फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा ओजी! असे वाटते की, आपण एकमेकांना ओळखून अनेक वर्षे झाली आहेत. तु एक सुंदर व्यक्ती बनली आहेस आणि मी तुला स्वतःसाठी कठोर परिश्रम करताना पाहिले आहे. मी नेहमीच तुझ्यासाठी असेन, आपण आपली सर्वोत्तम टीम तयार करू! माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
शाल्वच्या या पोस्टवर त्याची मालिकेतील सहकलाकार असणाऱ्या अन्विता फलटणकरने अर्थात स्वीटूने कमेंट करते, ‘प्रेम प्रेम’ लिहिले. दीप्ती केतकरने लिहिले, “छान फोटो वाढदिवसाच्या शुभेच्छा श्रेया”, अदिती सारंगधरने लिहिले, “हॅप्पी हॅप्पी बर्थडे श्रेया” याशिवाय शाल्वचे फॅन्सदेखील या फोटोवर कमेंट्स करताना दिसत आहे. शाल्व आणि श्रेयाच्या रिलेशनशिपला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या रिलेशनला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाल्वने श्रेयासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले होते की,‘Two years of madness and love’, त्याच्या या पोस्टला देखील त्याच्या फॅन्सकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा
-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे
-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका










