जॅकी श्रॉफ यांचा ‘द इंटरव्यू: नाईट ऑफ 26/11’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जॅकी इंटीमेट सीन करताना दिसला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, इंटीमेट सीन शूट करताना त्याला प्रचंड लाज वाटली. पण जर भूमिकेची मागणी आहे, तर ती करावीच लागेल. कारण तो एका अभिनेत्याच्या कामाचा भाग आहे.
एका वृत्तसंस्थेशी खास संवाद साधताना जॅकी इंटीमेट सीन शूट करण्याविषयी बोलले. ते म्हणाले की, “मला खूप लाज वाटत होती. जेव्हा मी हा सीन करत होतो, तेव्हा मी खूप अस्वस्थ होतो. मी हे करत आहे, कारण मी एक अभिनेता आहे.”
‘मागणीनुसार रोल करावा लागतो’
जॅकी पुढे म्हणाले की, “बरेच लोक तुमच्याकडे कॅमेऱ्यासमोर डोळे न झाकता पाहत असतात. डायरेक्टर, असिस्टंट, क्रू आणि संपूर्ण जग पाहत असतं. हे खूप लाजिरवाणे वाटते, पण तुम्हाला ते करावे लागते. कारण ते तुमचे काम आहे. जर भूमिकेला त्याची गरज असेल तर, ते तुम्हाला करावेच लागेल.”
‘फिल्म द इंटरव्यू: नाइट ऑफ 26/11’ मध्ये जॅकी एक जर्नलिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामध्ये त्यांना एका बॉलिवूड स्टारची इंटरव्यू घेण्यासाठी सांगितले जाणार आहे. हा डच चित्रपट ‘द इंटरव्यू’चा रीमेक आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जॅकी शेवटच्या वेळी ‘राधे’ चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी आणि रणदीप हुड्डासोबत दिसले होते. या चित्रपटात ते पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. त्यापूर्वी जॅकी ‘हॅलो चार्ली’मध्ये झळकले होते. जॅकी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले आहे. ते ‘ओके कॉम्प्युटर’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते. शिवाय ते लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहेत. चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. पण, कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.(shame on jackie shroff for intimate scenes said a lot of people are watching you)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्रेम स्वाभाविक नाही’, म्हणत नागराज मंजुळे यांनी सांगितला त्यांच्या पहिल्या प्रेमाचा भन्नाट किस्सा
माधुरी दीक्षितचे लग्न झाल्यावर ‘भिडू’ जॅकी श्रॉफ यांना झाले होते खूप दुःख, मुलाखतीत केला होता खुलासा










