Monday, July 1, 2024

अरे देवा! गाणं रिलीझ व्हायच्या आधीच झालं राकेश-शमिताचं ब्रेकअप; आता म्हणतायेत, ‘तुमच्यासाठीच…’

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि तिचा प्रियकर राकेश बापट (Raqesh Bapat) वेगळे झाले आहेत. शमिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून, दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. शमिताची ही घोषणा तिच्या आणि राकेश बापटच्या चाहत्यांची मनं तोडणारी आहे.

काही दिवसांपूर्वी, अशीही बातमी आली होती की शमिता आणि राकेशमध्ये काही ठीक चालले नाही आणि दोघेही वेगळे झाले आहेत. मात्र त्यावेळी अभिनेत्रीने त्या वृत्तांचे खंडन केले होते आणि ते दोघेही एकत्र असल्याचे सांगितले होते. मात्र आता अभिनेत्रीनेच ब्रेकअपची घोषणा केली आहे. (shamita shetty announces break up with raqesh bapat)

इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना शमिता शेट्टीने लिहिले की, “मला वाटते की हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. राकेश आणि मी आता एकत्र नाही, पण हा सुंदर म्युझिक व्हिडिओ सर्व चाहत्यांसाठी आहे. ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. तुमच्या प्रेमाचा वर्षाव असाच आमच्यावर करत राहा. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि कृतज्ञता.”


राकेश बापटनेही लिहिली पोस्ट
राकेश बापटनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहून शमितासोबतच्या ब्रेकअपची घोषणा केली आहे. राकेशने लिहिले, “मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, शमिता आणि मी आता एकत्र नाही. अत्यंत कठीण परिस्थितीत नियतीने आमची ओळख करून दिली. आम्हाला खूप पाठिंबा दिल्याबद्दल आणि खूप प्रेम दिल्याबद्दल शारा कुटुंबाचे खूप खूप आभार. मला माहित आहे की, हे ऐकून तुमचे हृदय तुटून जाईल. परंतु मला आशा आहे की तुम्ही आम्हा दोघांवर स्वतंत्रपणे प्रेमाचा वर्षाव करत राहाल. तुमच्या पाठिंब्याची सदैव गरज असेल. हे गाणे तुम्हा सर्वाना समर्पित आहे.”


शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची प्रेमकहाणी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’पासून सुरू झाली होती. त्यानंतर दोघेही काही काळ ‘बिग बॉस १५’मध्ये एकत्र दिसले होते. बाहेर आल्यानंतरही दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकत्र दिसले नव्हते, त्यामुळे दोघांमध्ये काही ठीक चालले नसल्याचा लोकांना संशय होता आणि अखेर आता शमिताने दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा