Tuesday, April 8, 2025
Home अन्य ‘शरारा शरारा’ गाण्यावर डान्स करत शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’वर एन्ट्री

‘शरारा शरारा’ गाण्यावर डान्स करत शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’वर एन्ट्री

सध्या प्रत्येकाच्या ओठावर एकाच नाव आहे ते म्हणजे ‘बिग बॉस १५. या शोची मागील अनेक दिवसांपासून सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रविवारी (८ ऑगस्ट) हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा शो यावर्षी काही दिवस ओटीटीवर दाखवण्यात येणार आहे. सुरुवातीचे काही दिवस हा शो कारण जोहर होस्ट करणार आहे. हा शो दर वर्षी सलमान खान होस्ट करत असतो. हा शो सहा आठवड्यांनंतर टीव्हीवर दाखवला जाणार आहे.

या शोमध्ये स्पर्धकांची एन्ट्री होत आहे. बिग बॉस १५ च्या स्पर्धकांची यादी समोर येत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिने टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस ओटीटीमध्ये प्रवेश केला आहे. तिने ग्रँड प्रीमिअरमध्ये स्पर्धक बनून शोमध्ये एन्ट्री केली आहे. तिने ‘शरारा शरारा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. (shamita shetty becomes a contestant in bigg boss OTT damce on sharara sharara)

बिग बॉस ओटीटीची ही खास गोष्ट असणार आहे की, एक तासाच्या या भागासोबत तुम्ही २४ तास या स्पर्धकांना लाईव्ह पाहू शकता. या ग्रँड प्रीमिअरमध्ये आतापर्यँत सहा पुरुष स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. निशांत सिंग, प्रतीक सहजपाल, करण नाथ, जिशान खान, राकेश बापट यांचा प्रवेश झाला आहे, तर शमिता शेट्टी आणि उर्फी जावेद यांचा प्रवेश झाला आहे.

बिग बॉस हा शो पहिल्यांदाच ओटीटीवर सुरू केला आहे. याचा प्रीमिअर वूट सिलेक्टवर रविवारी (८ ऑगस्ट) रात्री ८ वाजल्यापासून सुरू केला आहे. सोमवार ते शुक्रवार हा शो वूटवर संध्याकाळी ७ वाजता दाखवला जाणार आहे, तर वीकेंडला हा शो रात्री ८ वाजता दाखवला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा