Wednesday, July 2, 2025
Home कॅलेंडर ‘असाच’ नवरा हवाय गं बाई.!! शिल्पा शेट्टीच्या ४२ वर्षीय भगिनीला करायचंय लग्न, नवऱ्याबाबत आहेत ‘या’ खास अपेक्षा

‘असाच’ नवरा हवाय गं बाई.!! शिल्पा शेट्टीच्या ४२ वर्षीय भगिनीला करायचंय लग्न, नवऱ्याबाबत आहेत ‘या’ खास अपेक्षा

बॉलिवूडमधील अभिनेत्री शमिता शेट्टी या दिवसांत सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. बर्‍याचदा ती तिचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. शमिता आता तिच्या सिनेकारकिर्दीत काही खास काम करत नाहीये. नुकतीच ती ‘ब्लॅक विडोज’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती.

शमिताने नुकतेच तिच्या लग्नाबाबत वक्तव्य केले आहे.

शमिता शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला लग्न करायचे आहे. परंतू, तिच्या मार्गात एक अडचण आहे. शमिता म्हणाली, “मला लग्न करायचं आहे पण माझा वर कुठे आहे हे मला माहिती नाही. तो कुठेतरी आहे, आणि त्यानेच मला शोधायला पाहिजे. मी कोणापासून माझ्या मनातली गोष्ट लपवत नाही. म्हणूनच मी नेहमी अडचणीत सापडते. पण मला प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.”

शमिता याविषयी पुढे म्हणाली. “आजकाल समाजात आणि लग्नांमध्ये जे घडत आहे, ते भीतीदायक आहे. जर मला कोणाबरोबर लग्न करायचं असेल तर मला त्याच व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायला आवडेल. परंतु ज्याच्याबरोबर मला माझे जीवन व्यतीत करायचे आहे, अशी व्यक्ती मला अद्याप भेटली नाही.”

शमिता शेट्टीने 2000 मध्ये ‘मोहब्बतें’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 2009 साली टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ आणि 2019 मध्ये ‘खतरों के खिलाडी’ या टीव्ही शोचा ती भाग राहिली आहे. तसेच, शिल्पा शेट्टीची ही भगिनी इंटिरियर डिझायनरही आहे.

हे देखील वाचा