Wednesday, July 3, 2024

सलूनमध्ये गेल्यामुळे शमिता शेट्टी आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर; युजर म्हणाले, ‘जीजूच्या पैशावर ऐश करून…’

बॉलिवूडमधून सध्या अनेक धक्कादायक बातम्या येत आहेत. यातच मागील अनेक दिवसांपासून एक प्रकरण चांगले गाजले आहे. ते म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा प्रकरण. राज कुंद्राने अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाईन ऍपद्वारे प्रदर्शित केले आहेत, असा आरोप त्यावर लागला आहे. त्याला १९ जुलैला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. यासोबतच २७ जुलैला कोर्टाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या नंतर शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. एवढंच काय तर अगदी शिल्पा शेट्टीचा या सगळ्या प्रकरणात हात आहे असा आरोप लावला होता. तिच्या कामावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उभे केले होते. अशातच शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिला देखील आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. नुकतेच शमिता सलूनमध्ये स्पॉट झाली आहे. त्यामुळे ती आता जोरदार ट्रोल होत आहे.

‘मोहब्बते’ फेम अभिनेत्री शमिता शेट्टीला मुंबईमधील जुहू येथील एका सलूनमध्ये जाताना स्पॉट झाली आहे. यावेळी तिने टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स घातले होते. तिचा व्हिडिओ व्हायरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर युजर्स आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. शमिता सलूनमध्ये गेल्यामुळे यूजर्सने तिला ट्रोल केले आहे.

एका युजरने शमिता शेट्टीला चांगलेच निशाण्यावर धरले आहे. एकाने शमिताच्या या व्हिडिओवर कमेंट करून लिहिले आहे की, “जीजूच्या पैशावर ऐश करत असतेस. आज तो जेलमध्ये गेला तर मेव्हणी पार्लरमध्ये जात आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हिचा जीजू जेलमध्ये आहे, पण हिला काहीच फरक नाही. तो तर हिला लॉन्च करायची तयारी करत होता.” तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (shamita shetty troll for going salon amid raj kundra pronography case)

तसेच अनेक युजर्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. सोमवारी (२ ऑगस्ट) शिल्पा शेट्टीने या प्रकरणावर तिचे मत व्यक्त केले आहे. तिने तिचे अधिकृत स्टेटमेंट दिले आहे. तिने सांगितले आहे की, याबाबतीत याआधी कोणतेही स्टेटमेंट दिले नाही आणि याबाबत ती पुढे कधी बोलणार देखील नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा