Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड …म्हणून ‘शमशेरा’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी रणबीर कपूर मनातल्या मनात दिग्दर्शकाला द्यायचा शिव्या

…म्हणून ‘शमशेरा’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी रणबीर कपूर मनातल्या मनात दिग्दर्शकाला द्यायचा शिव्या

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) सध्या चर्चेचा भाग आहे. बऱ्याच दिवसांनी तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रणबीरच्या पुनरागमनाबद्दल त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. रणबीरचा ‘शमशेरा’ (shamshera) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘शमशेरा’ची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार असून तो पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत आहे. रणबीर त्याच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. त्याच्यासोबत ‘शमशेरा’ असणे सोपे नव्हते. शूटिंगदरम्यान त्याने काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

शमशेरामध्ये रणबीरसोबत वाणी कपूर (vani kapoor) आणि संजय दत्त (sanjay dutt) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीरने वडील आणि मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर रणबीरला दिवसातून २० वेळा आंघोळ करावी लागली.

रणबीर कपूरने शुटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की, सेटवर दररोज १०-१५ किलो धूळ ठेवली जात होती. शूटिंग सुरू होताच ही धूळ उडायची. त्‍यामुळे शुटिंग करताना ते डोळे, नाक आणि कानात जात असे. त्यामुळे चित्रीकरण करणे कठीण झाले होते. रणबीरने सांगितले की, धुळीमुळे त्याला किमान २० वेळा घरी जाऊन आंघोळ करावी लागली. इतक्या वेळा आंघोळ करूनही धूळ पूर्णपणे बाहेर आली नाही.रणबीरने सांगितले की, शूटिंगदरम्यान धुळीमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. त्यामुळे तो मनातल्या मनात दिग्दर्शकाला खूप शिव्या द्यायचा.

रणबीर कपूर लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने (alia bhatt) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली आहे. त्यामुळे ते दोघेही सध्या जोरदार चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पहिल्याच सीनने पर्ल व्ही पुरीने मिळवले होते प्रेक्षकांच्या मनात स्थान, ‘त्या’ एक चुकीने सगळं बिघडलं

‘एकदम नशेत’, म्हणत ‘या’ अभिनेत्याने केली मोनालिसा अन् तिच्या पतीच्या व्हिडिओवर कमेंट, तुम्हीही पाहा

मराठी सिनेसृष्टीत येतंय सिक्वेलचं वादळ, ‘या’ ५ चित्रपटांचे पुढील भाग होणार प्रदर्शित

हे देखील वाचा