Monday, July 1, 2024

जगात भारी शाहरुखचे फॅन; म्हणाला, ‘मी 5 गर्लफ्रेंडसोबत डंकी पाहणार’

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’ 21 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.

काही लोक आपल्या कुटुंबासह शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते, तर अनेक चाहते त्यांच्या मित्रांसोबत शाहरुखच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो एन्जॉय करताना दिसले. पण यापैकी शाहरुख खानचा एक चाहता आहे जो त्याच्या 5 मैत्रिणींसोबत शाहरुखचा चित्रपट पाहायला गेला होता.

नुकतेच एका सत्रादरम्यान, एका सोशल मीडिया युजरने डंकी’च्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘डंकी’ रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई करू शकते. हा प्रारंभिक अंदाज असला तरी अधिकृत डेटा आल्यानंतर या आकडेवारीत थोडे बदल होऊ शकतात. तिकिटे शेअर करताना लिहिले, ‘शाहरुख खान सर, मी माझ्या 5 मैत्रिणींसोबत डंकीचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहे. मला आशा आहे की त्या जास्त हसतील. चाहत्यांच्या ट्विटला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, ‘तुझं काय आयुष्य आहे.’

यंदा ‘पठाण’ आणि ‘जवान’नंतर शाहरुख खान आता ‘डंकी’ चित्रपटातून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला लोक मनोरंजक म्हणत आहेत. अनेकांनी या चित्रपटाचे रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ कारणामुळे बिपाशा बसूने केले करण सिंह ग्रोवरसोबत लग्न, लग्नाच्या 7 वर्षानंतर केला खुलासा
‘ऍनिमल’ चित्रपट लिहिण्याचे श्रेय न मिळाल्याने भडकल्या गझल धालीवाल, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा