Saturday, July 6, 2024

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसते. ती तिचे फोटो नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतात. शनाया कपूरने नुकताच तिचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिची प्रशिक्षक संजना मुथरेजा हिच्यासोबत बेली डान्स करताना दिसत आहे. नेहमी प्रमाणेच शनायाच्या या डान्स व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

शनायाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती फरशीवर संजनासोबत बेली डान्स करत आहे. यामध्ये तिचे हावभाव आणि डान्स मुव्हज खूपच कमालीचे दिसत आहेत.

शनायाने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “फ्लोर काम शिकणं ही नेहमीच एक अवघड गोष्ट असते. मला ही गोष्ट करण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल खूप धन्यवाद संजना मुथरेजा.” शनाया कपूरच्या या व्हिडिओला 2 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

शनाया कपूरने याआधी देखील असे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती बेली डान्स करताना दिसत आहे . करण जोहर शनायाला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः करणने सोशल मीडियावर केला होता.

शनायाने देखील तिच्या चित्रपटाची पोस्ट शेअर केली होती. तिचे इंस्टाग्रामवर 500 हजारांपेक्षाही जास्त फॉलोवर्स झाले आहेत. तिने हा आनंद साजरा करताना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार ऋतिकच्या एक्स वाईफचा वर्कआऊट व्हिडिओ पाहिला का? फिटनेस आयकॉन मलायकानेही केली कमेंट

-फिटनेस असावा तर असा! अभिनेत्री कॅटरिना कैफने शेअर केला अवघड वर्कआऊट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा