Wednesday, March 27, 2024

मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

बॉलिवूडमध्ये जशी जितेंद्र- तुषार, धर्मेंद्र- सनी, अमिताभ- अभिषेक या बाप-लेकांची जोडी पाहायला मिळते. तशीच जोडी आपल्याला टॉलिवूड चित्रपटांमध्येही पाहायला मिळते. सुपरस्टार राम चरण आणि मेगास्टार चिरंजीवी ही बाप-लेक जोडी एकत्र काम करत असलेल्या बहुप्रतिक्षित ‘आचार्य’ सिनेमाचे पहिले लिरिकल गाणे रिलीझ झाले आहे. आता हे गाणे भलतेच व्हायरल होत आहे.

रामचरण आणि चिरंजीवी यांचे ‘लाहे लाहे’ हे गाणे ३१ मार्चला आदित्य म्युझिक या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ करण्यात आले होते. एकाच दिवसात या व्हिडिओने ५५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. हे गाणे हरिका नारायण आणि सहिती चागांती यांनी गायले आहे, तर लिरिक्स रामजोगय्या शास्त्री यांनी लिहिले आहेत. तसेच गाण्याला व्ही वेंकटेश्वरलू यांनी संगीत दिले आहे. या गाण्याची लोकप्रियता पाहूनच हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. खऱ्या आयुष्यातील बाप-लेकाची ही जोडी चित्रपटामार्फत धमाल करणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाची प्रत्येक झलक पाहण्यासाठी चाहते पुरते वेडे झाले आहेत.

‘लाहे लाहे’ गाण्यात काजल अगरवालची झलक
चित्रपटाच्या पहिल्याच लिरिकल व्हिडिओमध्ये चिरंजीवी जबरदस्त अंदाज थिरकताना दिसत आहे. व्हिडिओत अभिनेत्री काजल अगरवाल आणि राम चरणचीही झलक पाहायला मिळाली आहे. काजलचा अंदाज खूपच आकर्षक असून चित्रपटाची शूटिंगही सुंदर ठिकाणांवर केली आहे.

चिरंजीवीच्या मुव्हजची होत आहे प्रशंसा
मणि शर्मा यांनी कंपोज केलेल्या या फोक गाण्याच्या व्हिडिओत चिरंजीवीचे वेगळे मुव्हज पाहायला मिळत आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी दिनेशने केली आहे. गाण्यावर चिरंजीवीच्या मुव्हजची जोरदार प्रशंसा केली जात आहे. त्याचा हा अंदाज पाहिल्यानंतर आचार्य चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

१४ मेला होणार रिलीझ
विशेष म्हणजे निर्मात्यांनी जेव्हा ‘आचार्य’ चित्रपटाच्या कास्टची घोषणा केली होती, तेव्हाच चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. मॅटिनी एन्टरटेन्मेंट आणि कोनिडेला प्रॉडक्शन कंपनीच्या बॅनरखाली ‘आचार्य’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. आचार्यचे दिग्दर्शन कोराताला शिवा करत आहेत. हा चित्रपट १४ मे, २०२१ रोजी रिलीझ होणार आहे. चित्रपटात राम चरण आणि चिरंजीवी यांच्याव्यतिरिक्त सोनू सूद, पूजा हेगडे, काजल अगरवाल आणि कीर्ति सुरेश यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तमन्ना भाटियाने वेगळ्याच अंदाजात केला ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावर डान्स, व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘लग्नानंतर काम करणार नाही’, शूटिंगवर परल्यानंतर अनुष्काचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

हे देखील वाचा