भारताच्या कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांच्यावर लवकरच एक बायोपिक येणार आहे. या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा चित्रपटातील कलाकारांबद्दल कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आता प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार या सिनेमात सरोजिनी नायडू यांच्या तरुण वयातील भूमिका अभिनेत्री सोनल मोंटेरो ही निभावणार असून, त्यानंतर ही भूमिका अभिनेत्री शांतिप्रिया साकारणार आहे. अभिनेत्री शांतिप्रिया तब्बल २८ वर्षांनी या बायोपिकच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. शांतिप्रिया यांनी ‘सौगंध’ सिनेमात अक्षय कुमारसोबत काम केले होते. आता २८ वर्षांनी त्या कमबॅक करणार आहे.
शांतिप्रिया यांच्या मनोरंजनविश्वातील करियरमध्ये त्यांचा सावळा रंग बाधा बनला. शांती यांच्या जीवनात एक अशी वेळ आली जेव्हा त्यांना त्यांच्या रंगामुळे काम मिळणे बंद झाले. त्यांनी शेवटचा सिनेमा ‘इक्के पे इक्का’ यात काम केले होते. हा सिनेमा १९९४ साली प्रदर्शित झाला होता. नंतर त्यांच्या रंगावरून त्यांना अनेक सिनेमाने गमवावे लागले होते. सौगंध हा सिनेमा आल्यानंतर त्यांना त्यांच्या रंगावरून जज केले गेले.
View this post on Instagram
एका मुलाखतीमध्ये शांतिप्रिया यांनी सांगितले होते की, रंगावरून इंडस्ट्रीमध्ये खूप भेदभाव करण्यात आला. रंगावरून त्यांना दिग्दर्शक १००, २०० लोकांसमोर अपमानित करायचे. मेकअप केल्यानंतर त्या सेटवर आल्या की त्यांना विचारले जायचे मेकअप कोणी केला. यावर त्या कोणाचेही नाव न घेता स्वतःच केला असे म्हणायच्या. अनेक कलाकारांनी देखील रंगावरून त्यांना टोमणे मारले होते. अजय देवगनच्या एका सिनेमस्तही स्क्रीन टेस्ट दिल्यानंतर त्यांना गोरी अभिनेत्री पाहिजे असल्याचे सांगण्यात आले होते.
शांतिप्रिया यांनी काही काळ टीव्ही इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना टीव्हीला देखील रामराम ठोकावा लागला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. शांती यांनी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेते असलेल्या सिद्धार्थ रे यांच्याशी लग्न केले होते, मात्र २००४ साली त्यांचे अचानक निधन झाले आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी अली. त्यांनी एकट्याने मुलांना मोठे केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस १६ नंतर झालेल्या पार्टीमध्ये सलमान खानने केली शिव ठाकरेशी चर्चा, वाचा काय म्हणाला दबंग खान
आता विवेक अग्निहोत्री बनले शारूखचे फॅन, ‘पठाण’चे यश पाहून ‘किंग’वर उधळली स्तुतीसुमने