कोरोनाचा उद्रेक पाहता, बऱ्याच ठिकाणी अजूनही लॉकडाऊनची परिस्थिती आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे शिक्षणावर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण तर सुरूच आहे, मात्र परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत. दहावीप्रमाणेच आता बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे.
परीक्षा रद्द झाल्याच्या बातमीवर विद्यार्थीवर्ग मात्र खुश आहेत. त्यांचा आनंद तर जणू काय गगनाला भिडला आहे. यावरून बरेच मीम्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शरद केळकरने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीही स्वत:ला हसण्यापासून रोखू शकणार नाहीत
हा व्हिडिओ अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटातील आहे. यात तुम्ही पाहू शकता की, किन्नरच्या वेशात असलेला शरद केळकर गुंडांसोबत लढत आहे. तसेच, नातेवाईक अभ्यासावरून नेहमीच मुलांना टोमणे देत असतात. अशावेळी या व्हिडिओत लिहिले आहे की, “नातेवाईक मुलांना म्हणतात, पास व्हायचे लक्षण तर नाहीत याचे.” यावर १२ वीचे विद्यार्थी कसे प्रत्युत्तर देतात, याचा हा मजेशीर व्हिडिओ आहे.
https://www.instagram.com/p/CPndCT3JlRK/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओ शेअर करत, शरदने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सर्व बॅकबेंचर्सना डेडिकेट.” या व्हिडिओवर आता विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्यांकडून व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अभिनेता शरद केळकरबद्दल बोलायचे झाले, तर त्याने अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लक्ष्मी’ चित्रपटात किन्नरच्या भूमिकेत शरद केळकरचे बरेच कौतुक झाले होते. यात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. याशिवाय ‘तानाजी’ मधील त्याच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…