सध्या श्रद्धा कपूर तिच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘स्त्री 2’ साठी चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त असलेल्या श्रद्धाचे अनेक चित्रपट काही यावर्षी तर काही पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. श्रद्धाच्या आगामी चित्रपटांमध्ये स्त्री 2, स्त्री 3 आणि टाइम ट्रॅव्हलवर आधारित चित्रपटांचा समावेश आहे. इतकेच नाही तर श्रद्धा कपूर एका चित्रपटात नागिणीच्या भूमिकेतही दिसणार आहे.
स्त्री २ मध्ये श्रद्धाशिवाय राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराणा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्त्री 2’ चे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे आणि मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांची निर्मिती आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये आलेल्या ‘स्त्री’चा सिक्वेल आहे. मॅडॉक हॉरर युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
‘स्त्री 2’ नंतर श्रद्धाचा ‘स्त्री 3’ हा चित्रपटही येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘स्त्री 3’ बनवण्याची घोषणा ‘स्त्री 2’ च्या प्रमोशन दरम्यान करण्यात आली आहे. मात्र, ‘स्त्री 3’ कधी येणार याची वेळ आणि तारीख अद्याप ठरलेले नाही. पण ‘स्त्री’ आणि नंतर ‘स्त्री 2’बद्दल चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता पाहून चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग आणण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रद्धाचा आणखी एक चित्रपट, जो टाईम ट्रॅव्हलवर आधारित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा टाइम ट्रॅव्हलवर आधारित चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही तसेच या चित्रपटातील उर्वरित स्टारकास्टबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र या चित्रपटात श्रद्धा कपूर नक्कीच दिसणार हे निश्चित आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘नागिन’ नावाच्या चित्रपटात श्रद्धा एका नागिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. हे पात्र यापूर्वी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने साकारले होते. मात्र, ही भूमिका श्रद्धा कपूरसाठी सोपी नसणार नाही. पण, श्रद्धाला या भूमिकेत पाहणे रंजक असेल. या चित्रपटाचे निर्माते निखिल द्विवेदी आणि दिग्दर्शक विशाल फुरिया आहेत. अजून या चित्रपटातील उर्वरित कलाकारांची घोषणा करण्यात आलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
या सुपरस्टारमुळे अभिषेक बच्चनने रस्त्यावर घालवली होती रात्र, एका चुकीची मिळाली शिक्षा