Saturday, July 6, 2024

‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा

कलाकार कुठलाही असो, त्याच्या गाड्यांविषयी, संपत्तीविषयी, आलिशान आयुष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते. अशीच काहीशी उत्सुकता आता प्रसिद्ध व्यावसायिक विनीता सिंग यांच्या संपत्तीविषयी लागलेली आहे. विनीता ‘शार्क टँक इंडिया 1‘ या हिट रियॅलिटी शोच्या परीक्षक राहिल्या होत्या. आता या शोच्या दुसऱ्या भागातही विनीता दिसणार आहेत. यानिमित्ताने विनीता यांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया…

विनीता सिंग (Vineeta Singh) यांच्या नावाचा समावेश श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो. त्या शुगर कॉस्मेटिक्सच्या संस्थापिका आहेत. त्या सध्या ‘शार्क टँक इंडिया’मध्येही परीक्षकाच्या भूमिकेत सामील झाल्या आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, विनीता या शुगर कॉस्मेटिक्समार्फत प्रत्येक वर्षी 22 कोटी रुपयांची कमाई करतात. या कमाईसोबतच त्या कॉस्मेटिक्स ब्रँडमधून 1 ते 1.5 कोटी रुपयांची कमाई करतात. एका रिपोर्टनुसार, त्यांनी या बिझनेस रियॅलिटी शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये परीक्षक म्हणून सामील होण्यासाठी 5 लाख रुपये घेतले आहेत. त्यांची एकूण संपत्ती तब्बल 300 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

विनीता यांच्या शुगर कॉस्मेटिक्स ब्रँडचे 130हून अधिक शहरात 2500हून अधिक ब्रँडेड आऊटलेट आहेत. यामधून 100 कोटींहून अधिक कमाई होते. मात्र, या ब्रँडपूर्वी त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता आणि त्यांना 1 कोटी रुपये पगाराची नोकरीची ऑफर आली होती. त्यांनी ती नोकरी फेटाळत शुगर कॉस्मेटिक्स (Sugar Cosmetics) या कंपनीचे साम्राज्य 2012पासून सुरू केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vineeta Singh (@vineetasng)

विनीता सिंग यांचे आलिशान घर
विनीता सिंग यांच्याकडे मुंबईत स्वत:चे आलिशान घर आहे. त्यांच्या घरात गरजेच्या सर्व वस्तूंचा समावेश आहे. त्यांच्या घराची प्रति स्क्वेअर फुट किंमत तब्बल 750000 रुपये असल्याचे सांगण्यात येते. विनीता यांच्या शानदार घरात त्यांच्या खासगी जिमपासून डायनिंग स्पेसचाही समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vineeta Singh (@vineetasng)

विनीता सिंगचे कार कलेक्शन
विनीता सिंग यांच्याकडे 79.78 लाख रुपयांची मर्सिडीत बेंझ जीएल-क्लास (Mercedes Benz GL-Class) ही कार आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. (shark tank india 2 judge vineeta singh house car collection salary and total net worth know all here)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमानने मिठीत घेताच घाबरलेली अभिनेत्री, भाग्यश्रीने 3 तास फोडलेला हंबरडा; शेवटी थेट डिरेक्टरला…
‘बाळा मोठ्यांशी…’, युजरने ‘पठाण’ला सुपरफ्लॉप म्हणताच शाहरुखने केली बोलती बंद; पाहा ट्वीट

हे देखील वाचा