Friday, June 14, 2024

सलमानने मिठीत घेताच घाबरलेली अभिनेत्री, भाग्यश्रीने 3 तास फोडलेला हंबरडा; शेवटी थेट डिरेक्टरला…

रुपेरी पडद्यावर आपण जे काही पाहतो, ते घडण्यासाठी पडद्यामागे खूप काही गोष्ट घडत असतात. त्यादरम्यान अनेक चांगल्या- वाईट गोष्टी घडत असतात. काही कलाकारांचा पदार्पणाचा सिनेमा असल्यामुळे त्यांच्या वाट्याला विचित्र अनुभवही येतात, ज्याचा खुलासा नंतर स्वत: कलाकारच करत असतात. मात्र, सिनेमा जेव्हा रुपेरी पडद्यावर येतो, तेव्हा त्या कलाकारांच्या भूमिकेमुळे त्या सिनेमाला प्रेक्षकांची वाहवा मिळतेच मिळते. असाच एक सिनेमा होता, ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तो सिनेमा म्हणजेच ‘मैंने प्यार किया‘ होय. या सिनेमातील भाग्यश्री हिच्या कामाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. मात्र, या सिनेमातील एक किस्सा असा आहे, जो कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. चला तर त्याविषयी जाणून घेऊया…

सूरज बडजात्या हे 1989मध्ये ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) हा सिनेमा घेऊन आले होते. हा ब्लॉकबस्टर लव्ह ड्रामा सलमान खान (Salman Khan) याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा सिनेमा ठरला होता. या सिनेमामुळे सलमानला इंडस्ट्रीत आपली जागा मिळवून दिली. तसेच, भाग्यश्रीनेही या सिनेमातून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.

साधी सोज्वल होती भाग्यश्री
या सिनेमात भाग्यश्रीला साधी सोज्वल मुलीच्या रूपात दाखवण्यात आले होते, जी मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी होती. खऱ्या आयुष्यातदेखील भाग्यश्री खूपच साधी सोज्वळ होती. तिच्या कुटुंबामुळे भाग्यश्री जास्त लाईमलाईटमुळे नव्हती. सिनेमात काम करणे ही तिच्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. सिनेमातील एका सीनदरम्यान ती इतकी घाबरली होती की, ती तासंतास रडत राहिलेली.

सलमानने मिठी मारताच पडली होती चिंतेत
माध्यमांतील वृत्तांनुसार, सिनेमातील ‘कबूतर जा जा…’ हे हिट गाणे संपल्यानंतर भाग्यशी आणि सलमान यांच्यात मिठी मारण्याचा सीन होता. जेव्हा सीन शूट करताना सलमानने भाग्यश्रीला मिठीत घेतली, तेव्हा ती खूपच घाबरली. सीन ओके झाल्यानंतर ती रडू लागली आणि तब्बल 3 तास ती चिंतेत होती. यानंतर जेव्हा ती स्थिर झाली, तेव्हा सूरज यांनी तिला विचारले की, ती चिंतेत का आहे? त्यावेळी भाग्यश्रीने म्हटले की, तिने कधीच परक्या व्यक्तीला अशाप्रकारे मिठी मारली नव्हती. याव्यतिरिक्त सूरज यांनी तिला म्हटले की, तिला जसे योग्य वाटेल, तशाप्रकारे सीन शूट करूया.

यानंतर सलमान आणि भाग्यश्रीमधील किसींग सीनदेखील काचेची भिंत ठेवून शूट केला होता. (actor salman khan hug scene with bhagyshree in sooraj badjatya 1989 movie maine pyar kiya)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

जॅकलिनने बोल्डनेसची हद्दच केली पार, पाहा व्हायरल फोटोशूट!

हे देखील वाचा