शरमन जोशींचे वडील आणि गुजराती मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकार अरविंद जोशी यांचे निधन


बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी याचे वडील आणि गुजराती नाटकांमधील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी आज पहाटे निधन झाले. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते त्यांच्या वयोमानानुसार अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त होते.

परेश रावल यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, ” भारतीय रंगमंचाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिशय दुःखद अंतःकरणाने आपण अभिनेते श्री अरविंद जोशी यांना अलविदा म्हणत आहोत. एक कर्तृत्ववान, अष्टपैलू अभिनेते असे काही शब्द त्याचे वर्णन करताना माझ्या डोकयात येत आहेत. मी शरमन जोशी आणि त्याच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”

कोमल नाहाटा यांनी देखील ट्विट करून अरविंद जोशी यांना आदरांजली वाहिली आहे.

अरविंद जोशी यांनी काही यशस्वी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती गुजराती नाटकांमधून. त्यानी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम करत काही नाटकांचे दिग्दर्शन देखील केले. अरविंद जोशी यांनी ‘इत्तेफाक’, ”शोले’ अपमान की आग, ‘खरीदार’, ‘ठीकाना’ ‘नाम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये सहायक भूमिका देखील साकारल्या. सोबतच त्यानी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले.

अरविंद जोशी यांना दोन मुलं आहेत. शरमन जोशी मुलगा आणि मुलगी मानसी जोशी. त्याचे दोन्ही मुलं अभिनयाच्या क्षेत्रात कर्यरत आहे. शरमन चित्रपटांमध्ये तर मुलगी हिंदी मालिकांमध्ये काम करते. मानसीने अभिनेता रोहित रॉयसोबत लग्न केले आहे. शिवाय जेष्ठ अभिनेत्री सरिता जोशी ह्या त्यांच्या बहीण आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.