Sunday, April 14, 2024

शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

आपल्या अभिनयाने साठ, सत्तर आणि ऐंशीचे दशक गाजवलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर होय. त्यांनी सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. शर्मिला यांना त्या काळात अनेक ज्येष्ठ कलाकारांसोबत काम केले आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावले, पण शर्मिला यांना एक फोटोशूटमुळे वादाला सामोरे जावे लागले होते. त्या काळात भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडींसोबत त्या रिलेशनशिपमध्ये होत्या. मन्सूर यांनी शर्मिला यांच्या वाईट काळात खूप साथ दिली.

शर्मिला टागोरांचे बिकनी फोटोशूट व्हायरल
शर्मिला यांनी त्याकाळी एक मासिकासाठी बिकनी फोटोशूट केलं होतं. शर्मिला यांचे बिकनी फोटोशूट जेव्हा व्हायरल झाले, तेव्हा चाहत्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. पण एकमेव मन्सूर अली खान पतौडी असे होते, ज्यांनी शर्मिला यांना साथ दिली.

शर्मिला टागोर यांनी ‘या’ कारणासाठी केले फोटोशूट
सौंदर्यवती शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “मला वाटले की, बिकनीमध्ये मी प्रचंड सुंदर दिसेल. म्हणून मी फोटोशूट केले. पण वेगळच काहीतरी घडलं.” त्यांचे ते फोटो पाहून फोटोग्राफरही घाबरला होता. युजर्सनीीही अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावर शर्मिला म्हणाल्या की, “त्यावेळी परिस्थिती थोडी विचित्र होती. सोशल मीडिया नव्हता, पण परिस्थिती अत्यंत नाजूक होती. हे मासिक प्रकाशित झाले, तेव्हा मी लंडनमध्ये होते.”

मन्सूर अली खान पतौडीची ‘ही’ प्रतिक्रिया
मासिकाचे प्रकाशन झाल्याची बातमी तिला शक्तींनी दिली. ते म्हणाले की, “हे सर्व थांबवण्यासाठी काहीतरी करावे लागेल.” हे ऐकून शर्मिला यांना धक्काच बसला. त्या प्रचंड नर्व्हस झाल्या. त्यावेळी पती मन्सूर अली खान पतौडी यांची प्रतिक्रिया सांगताना त्या म्हणाल्या की, “मी टायगर (मन्सूर अली खान) यांना एक टेलिग्राम पाठवले आणि त्यांनी मला म्हटले की, ‘मी हे दाव्याने म्हणू शकतो की, तुम्ही चांगल्या दिसत असाल.’ त्यांनी मला खूप साथ दिली होती.”

या घटनेनंतर शर्मिला यांनी घेतला धडा
शर्मिला यांनी या घटनेनंतर एक धडा घेतला. त्यांनी सांगितले की, “मला अशी शिकवण मिळाली होती की, जर तुम्ही सेलिब्रिटी आहात, तर तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत. तुम्हाला हे समजले पाहिजे की, तुमचा प्रेक्षकवर्ग कोणता आहे, तसेच ते तुमच्याकडून काय अपेक्षा करतात.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मला हे समजले होते की, लोक ग्लॅमरकडे आकर्षित होतात, परंतु त्यांच्या मनात इतरांसाठी सन्मान नसतो. लोकांच्या मनात स्वत:साठी मला इज्जत हवी होती. त्यासाठी मी आपली प्रतिमा बदलण्यास सुरुवात केली.”

लग्नापूर्वी सासूबाईने ठेवली होती अट
शर्मिला यांनी 27 डिसेंबर, 1969 मध्ये मन्सूर अली खान यांच्याशी लग्न केला होता. मात्र, लग्नापूर्वी टायगर पतौडी यांच्या आई साजिदा सुल्तान यांनी अभिनेत्रीपुढे एक अट ठेवली होती. साजिदा सुल्तान यांनी शर्मिला यांना म्हटले होते की, जर धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारला, तर त्या या लग्नासाठी तयार होतील. शर्मिला यांनीही लगेच ही अट मान्य केली होती. त्यानंतर इस्लाम स्वीकार करून शर्मिला टागोर या आयेशा सुल्तान बनल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ एका कारणासाठी अभिनेते धर्मेंद्र चुकवायचे सीन, शोले चित्रपटातला रंजक किस्सा ऐकून व्हाल थक्क
शॉकिंग! ब्लॉकबस्टर ‘केजीएफ’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, कलाविश्वावर दु:खाचा डोंगर

 

हे देखील वाचा