Friday, February 21, 2025
Home बॉलीवूड तब्ब्ल ११ वर्षांनी ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर परतणार शर्मिला टागोर

तब्ब्ल ११ वर्षांनी ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर परतणार शर्मिला टागोर

जुन्या काळातील टॉपच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौंदर्यवती शर्मिला टागोर लवकरच मोठ्या पडद्यावरून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवताना दिसणार आहे. शर्मिला टागोर यांचे लवकरच चित्रपटांमध्ये कमबॅक होणार आहे. तब्ब्ल ११ वर्षांनी शर्मिला चित्रपटांमध्ये काम करताना दिसतील. ‘गुलमोहर’ नावाच्या चित्रपटात त्या बत्रा कुटुंबाच्या कुलदेवीची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्यासोबतच या सिनेमात मनोज बाजपेई, अमोल पालेकर, सूरज शर्मा आणि सिमरन ऋषि बग्गा आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील.

‘गुलमोहर’ सिनेमाबद्दल शर्मिला प्रचंड उत्साहात असून त्यांच्या मते, “या सिनेमात काम करताना मला खूपच आनंद होत आहे. शूटिंगच्या वेळेस सेटवर अगदी घरासारखेच वातावरण होते. चित्रपटाची कथा ऐकत असतानाच मी सिनेमाला होकार दिला. कारण या सिनेमात असलेला कौटुंबिक स्पर्श मला भावला. हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.”

Sharmila-Tagore

तत्पूर्वी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून, सिनेमा याचवर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित केला जाईल. या सिनेमाची कथा बत्रा कुटुंबाभोवती फिरते. आपल्या ३४ वर्ष जुन्या खानदानी घरात सोडून हे कुटुंब दुसरीकडे राहायला जाणार असते, मात्र अशी काही परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे त्यांची नाती पारखली जातात. यादरम्यानच अनेक सत्य देखील उघडकीस येतात.

चित्रपटात मनोज बाजपेई मुख्य भूमिकेत असून, त्यानी हा सिनेमा करण्याची काही कारणं सांगितली त्यातले मुख्य कारणं म्हणजे शर्मिला टागोर आणि हृदयाला स्पर्श करणारी कथा. त्यांना खात्री आहे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेईल. शर्मिला टागोर असल्यामुळे या सिनेमाला एक वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा