आनंदाची बातमी! मराठी अभिनेत्याच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; सोशल मीडियावरून शशांकने दिली माहिती


कलाविश्वात अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकत आहेत, तर अनेक कलाकार आई बाबा होत आहे. नुकतेच करीना कपूर आणि सैफ अली खान या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची बातमी आली. हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. आता मराठी सिनेसृष्टीतूनही आनंदाची बातमी येत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय शशांक केतकरच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले असून तो बाबा झाला आहे. शशांकची पत्नी प्रियंका ढवळेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी सर्वांना सांगितली आहे. यासोबतच त्याने एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्याने त्याच्या बाळाला हातात धरले आहे. मात्र, बाळाचा चेहरा दिसत नाहीये. त्याने हा फोटो पोस्ट करत “ऋग्वेद शशांक केतकर” असे लिहिले आहे.

शशांकने २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी पत्नी प्रियांका सोबतचा क्युट फोटो शेअर करत तो बाबा होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्याची ही पोस्ट सर्वांसाठीच आश्चर्याचा सुखद धक्काच होती. शशांकची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती.

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून शशांक घराघरात पोहोचला आणि तुफान लोकप्रिय झाला. या मालिकेतील त्याची श्री ही भूमिका अजूनपर्यंत कोणीही विसरले नाही. या मालिकेनंतर शशांकने ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘इथेच टाका तंबू’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा..’ या मालिकांमध्येही काम केले. याशिवाय ’31 दिवस’, ‘आरॉन’, ‘वन वे तिकीट’ या सिनेमांमध्ये देखील तो झळकला होता.

शशांक लवकरच झी मराठीच्या ‘पाहिले न मी तुला’ मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.