Monday, July 1, 2024

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

सिनेसृष्टीमध्ये सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चर्चा सुरू आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील कनेक कलाकार शाहरुखच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखला धीर दिला आहे. तसेच काही कलाकार तर त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून ताच्या पाठीशी उभे राहिलेले दिसले आहेत. अशात सध्या ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे देखील त्याच्यासाठी धावून आले आहेत.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी आर्यन खानबद्दल काही वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले आहेत की, “आर्यन खानला टार्गेट केले जात आहे. कारण तो शाहरुख खानचा मुलगा आहे. सर्वत्र त्याच्यावर चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला देखील अटक झाली आहे. त्यांच्याविषयी कोणीही काहीही बोलताना दिसत नाही.”

सुरू आहे सूढ घेण्याचे काम
मुलाखतीमध्ये पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की, “आर्यनकडे कोणतेही अं’मली पदार्थ मिळाले नाहीत. अशा प्रकरणी गुन्हेगाराला एक वर्षाची शिक्षा होते, पण आर्यनबरोबर तसेही काही घडत नाही. त्याला मुद्दामून त्रास दिला जात आहे. शाहरुखबरोबर असलेले जुने वाद उकरुन काढत अशाप्रकारे त्याचा सूढ घेतला जात आहे. शाहरुखबरोबर असलेल्या मतभेदांमुळे त्याचे विरोधक त्याच्याशी असे वागत आहेत.”

रक्ताची तपासणी का नाही केली?
शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे एनसीबीवर एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “जर आर्यन अं’मली पदार्थांप्रकरणी अटकेत आहे, तर त्याची रक्त तपासणी का केली नाही. अशा प्रकरणी या सर्व तपासण्या केल्या जातात.”

त्यानंतर त्यांनी किरण गोसावीवर निशाणा साधला आणि म्हणाले, “एक व्यक्ती, तर एनसीबी कार्यालयाबाहेर असे फिरत होता, जसे काही तो जत्रेलाच आला आहे. त्याला अशा पद्धतीने फिरण्याची अनुमती कोणी दिली. ज्या व्यक्तीवर आधीच काही गुन्हे दाखल आहेत तो व्यक्ती आर्यनबरोबर अशी सेल्फी घेत होता जसे काही तो त्यांच्या घरचा जावईच आहे. या सर्व गोष्टींवरून हेच समजते की, काही तरी यामध्ये लपवाछपवी सुरू आहे.”

इंडस्ट्रीमध्ये आहेत भित्र्या व्यक्ती
पुढे सिनेसृष्टीवर देखील त्यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “शाहरुखचे समर्थन करण्यास कोणीच पुढे येत नाहीये. प्रत्येक जण असेच म्हणत आहे की, ही त्याची समस्या आहे, ती त्यानेच सोडवली पाहिजे. ज्याने त्याने आपआपले पाहावे असेच सर्वांना वाटत आहे. या इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती भरल्या आहेत.”

जातीपातीचे राजकारण नको
शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे असेही सांगितले की, “शाहरुख खान मुस्लिम समाजाचा आहे, म्हणून त्याला टार्गेट केले जात आहे, असे काही जण म्हणतात. मात्र, हे चुकीचे आहे. कारण काहीही असले, तरी तो एक भारतीय आहे. संविधानाच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत.”

शत्रुघ्न सिन्हा यांच्या आधी ऋतिक रोशनने देखील शाहरुख खानला पाठिंबा दिला होता. मात्र, तेव्हा त्याला ट्रोल केले गेले होते. तसेच सलमान खान आणि मिका सिंगने देखील शाहरुखची बाजू घेतली होती. त्यावेळी मिका म्हणाला होता की, “एनसीबीला या प्रकरणात फक्त आर्यन खानच दिसतो का?”

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार हळूहळू या प्रकरणी स्वतःचे मत मांडत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भावाच्या अटकेनंतर सुहाना खान पडली आजारी, शाहरुख- गौरीकडून सतत घेतेय अपडेट

-आर्यन खानची रात्र कारागृहातच; सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला जामीन

-इंग्रजीवरून आणि बॉडीशेमिंगवरून ट्रोल झालेली मोनालिसा नेहमीच करते ट्रोलर्सकडे दुर्लक्ष

हे देखील वाचा