Thursday, March 28, 2024

भावाच्या अटकेनंतर सुहाना खान पडली आजारी, शाहरुख- गौरीकडून सतत घेतेय अपडेट

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोणतीही अडचण आल्यानंतर, त्याच्यासाठी कुटुंबातील इतर व्यक्तींनाही चिंता वाटू लागते. अनेकदा सदस्यांना मोठा धक्का बसून त्यांची तब्येतही बिघडते. असेच काहीसे सध्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या कुटुंबात घडत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणी कारागृहात आहे. त्यामुळे त्याचा मोठा धक्का त्याची बहीण सुहाना खानलाही बसला आहे. सुहानाची तब्येत बिघडली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सुहाना आपला भाऊ आर्यन खानबाबत वडील शाहरुख आणि आई गौरी खानकडून सतत माहिती घेत आहे. असे म्हटले जात आहे की, सुहाना तिच्या भावासाठी खूपच चिंतेत आहे आणि त्याच्याबाबत सतत विचारत राहते.

असेही म्हटले जात आहे की, सुहाना आपल्या आईला सतत फोन करून आर्यनबाबत विचारपूस करत आहे. तिला वडील शाहरुखचीही चिंता सतावतेय. माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हापासून सुहानाला समजले आहे की, भाऊ आर्यनच्या अटकेनंतर वडील शाहरुखला धड झोपही येत नाही आणि नीट जेवणही जात नाहीये, तेव्हापासून तीदेखील चिंतेत आहे. सुहानाने वडिलांकडे भारतात परतण्याची परवानगी मागितली आहे. असे असले, तरीही शाहरुखला वाटत नाही की, तिने भारतात यावे. (Shahrukh Khan Daughter Suhana Khan Is Worried And Sick After Aryan Khan Arrest)

माध्यमांमध्ये असाही दावा केला जात आहे की, आर्यन खानच्या अटकेनंतर सुहाना आजारी पडली आहे. तिला भावाची खूपच चिंता सतावतेय. असेही म्हटले जात आहे की, सुहानाला जेव्हा आर्यनच्या अटकेबाबत समजले होते, तेव्हाच तिला विमानाने भारतात परतायचे होते.

परंतु शाहरुख आणि गौरीने निर्णय घेतला की, आता सुहानाने मुंबईत परतले नाही पाहिजे. असे असले, तरीही जेव्हापासून आर्यनचे नाव अं’मली पदार्थ प्रकरणात आले आहे, तेव्हापासून संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. शाहरुख त्याच्या मुलाला लवकरात लवकर जामीन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने आता आपले वकिलही बदलले आहेत.

असेही म्हटले जात आहे की, शाहरुख आणि गौरीची अशी इच्छा आहे की, या सर्व प्रकरणांचा प्रभाव त्यांचा छोटा मुलगा अबराम खानवर पडू नये. कारण तो हे सर्व समजण्यासाठी अजून खूपच लहान आहे. या घटनेनंतर शाहरुख खानला बॉलिवूडमधून पाठिंबाही मिळत आहे. कलाकार म्हणत आहेत की, आर्यन खान शाहरुखचा मुलगा असल्याने त्याला टार्गेट केले जात आहे. या कठीण प्रसंगी मिका सिंगपासून ते ऋतिक रोशनपर्यंत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शाहरुखला आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानची रात्र कारागृहातच; सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला जामीन

-आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न

-कार्तिक आर्यन साकारणार जगातील सर्वात गरीब ‘प्रिन्स’, पुन्हा एकदा सोबत दिसणार ‘ही’ क्यूट जोडी

हे देखील वाचा