हे वर्ष तर कोरोनामुळे सेलिब्रिटीपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांसाठीच खूपच जास्त त्रासदायक ठरले. अनेक वाईट घटना २०२० वर्षाने सर्वाना दिल्या. असे असले तरी २०२० च्या शेवट शेवट बॉलिवूडकरांनी मात्र या दुःखातही सुखाचे क्षण शोधूनच काढले. दिवाळीनंतर बॉलिवूडमध्ये लग्नांच्या रूपाने आनंद आला आहे. मागच्या एक महिन्यापासून बॉलिवूडमध्ये अनेक लग्न होताना दिसत आहे. नेहा कक्करच्या लग्नापासून सुरु झालेला हा सिलसिला सना खान, आदित्य नारायण, पुनीत पाठक, क्रिकेटर युजवेंद्र चहल करत आता गौहर खान पर्यंत येऊन पोहचला आहे. या यादीत लवकरच प्रियांक शर्मा आणि शजा मोरानी या जोडीची भर पडणार आहे. जेष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक आणि प्रसिद्ध निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शजा यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. १६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर यादोघांनी साखरपुडा केला आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरने प्रियांक आणि शजाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धांतने फोटो शेयर करत लिहले की, ‘तुमच्या दोघांसाठी मी खूप खुश आहे. या जगातील माझे दोन सर्वात आवडते लोक लग्न करत आहे, शुभेच्छा.’ या कार्यक्रमात फक्त कुटुंबातील लोकं आणि मित्रपरिवारच उपस्थित होता. प्रियांक आणि शजा साखरपुड्यानंतर लवकरच लग्न देखील करणार असल्याची बातमी आहे. प्रियांक हा श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे. या दोघांच्या साखरपुडयाची बातमी समजताच अनेक कलाकार आणि फॅन्सने त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.
प्रियांक हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा असून त्याने, २०२० सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘सब कुशल मंगल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातून प्रियांक सोबत अभिनेता रवी किशनच्या मुलीने रिवा किशनने देखील बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. प्राप्त बातमीनुसार प्रियांकने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी न्यूयॉर्कच्या Strasberg Institute मधून अभिनयाचा कोर्स केला आहे.
शजा मोरानी ही ‘चेन्नई एक्सप्रेस’ व ‘रा-वन’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या करीम मोरानी यांची मुलगी आहे. करीम मोरानी हे शाहरुख खानचे खूप जवळचे मित्र आहेत. शजा मोरानीने सहायक दिग्दर्शक म्हणून ‘ऑल्वेज कभी कभी’, ‘हैप्पी न्यू इयर’ सारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे.