Wednesday, July 3, 2024

वाऱ्याची एक झुळूक ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालासाठी ठरली लाजिरवाणी, सोशल मीडियावर झाली ट्रोल

कलाकार नेहमीच त्यांच्या डिझायनर आणि वेगवेगळ्या कपड्यांसाठी ओळखले जातात. मीडिया आणि सामान्य लोकं कलाकारांच्या कपड्यांचे खूपच बारीक निरीक्षण करतात आणि त्यांना कलाकारांचे कपडे आवडले की त्याचे अनुकरण लोकं त्यांच्या खऱ्या आयुष्यात करतात. मात्र कलाकारांचे अतिशय महागडे आणि सुंदर कपडे त्यांना कधी कधी लोकांपुढे आणि मीडियापुढे लाजवतात देखील. अभिनेत्रींना तर अनेकदा त्यांच्या ऊप्स मुव्हमेंटचा सामना करावा लागतो. या घटना अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होतात तर कधी कुटुंबाच्या कॅमेऱ्यांमध्ये. मात्र या घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. यात टेलिव्हिजन, बॉलिवूड अशा सर्वच क्षेत्रातील अभिनेत्रींचा समावेश असतो. अनेक अभिनेत्री या कारणांमुळे देखील मोठ्या प्रकाशझोतात येतात.

‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) मागील अनेक वर्षांपासून आपल्या सौंदर्याची आणि डान्सची जादू सर्वांवर चालवत आहे. आज या गाण्याच्या इतक्या वर्षांनंतरही शेफाली तेवढीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. सध्या शेफालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेफालीला तिच्या ड्रेसमुळे ऊप्स मुव्हमेंटचा सामना करावा लागला आहे. बऱ्याचदा कलाकरांना त्यांच्या कपड्यांमुळे अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. शेफालीच्या बाबतीत असे नुकतेच घडले आहे. सध्या शेफाली आणि तिचा नवरा अभिनेता पराग त्यागी मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

यादरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा नवरा पराग योर्टवर असून, ते टायटॅनिक पोज देताना दिसत आहे. ते ही पोज देत असतात आणि वाऱ्याची झुळूक येते आणि तिचा ड्रेस वर उडतो. शेफालीने या सुट्ट्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, ते फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. याच व्हिडिओमध्ये तिचा हा ऊप्स मुव्हमेंटवाला एक व्हिडिओ खूपच चर्चेत आला असून, तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने लेस असलेला पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला असून, हवेमुळे तो वर उडत आहे.

मात्र शेफालीला या ऑकवर्ड क्षणानंतरही अजिबात जास्त फरक पडला नाही. तिने त्याकडे दुर्लक्ष करत तिचे क्षण एन्जॉय करत आहे. तिने हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यांची रोमँटिक केमिस्ट्री यात दिसून येत आहे. शेफालीला जरी याचा काही फरक पडला नसला तरी सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या कमेंट्स करत लोकं तिच्या या व्हिडिओवर तिला ट्रोल करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा