टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्येही मानसिक आरोग्याबाबत चर्चा वाढल्या आहेत. दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), इरा खान (Ira Khan) यांसारखे अनेक कलाकार याबाबत त्यांचे मत व्यक्त करत आहेत. अशातच याबाबत ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिने तिचे मत व्यक्त केले आहे. तिने सांगितले की, १५ वर्षाची असताना तिला झटके यायचे. तसेच तिने यावर देखील तिची प्रतिक्रिया दिली की, २००२ मधील सुपरहिट म्युझिक व्हिडिओनंतर ती का गायब झाली होती.
शेफालीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “मला १५ वर्षाची असताना झटका आला होता. मला आठवतं तेव्हा मला मी अभ्यास नीट करावा यासाठी खूप दबाव होता. त्यामुळे तणाव आणि या टेन्शनमुळे मला झटके येत होते. त्यामुळे कुठेतरी माझा आत्मविश्वास कमी व्हायला लागला होता.” (Shefali jariwala reveals why she does not work after kaanta laga song success)
तसेच तिने सांगितले की, ‘कांटा लगा’ हा म्युझिक व्हिडिओ यशस्वी झाल्यानंतर देखील तिने काम का केले नाही. तिने सांगितले की, “झटके येत असल्याने मी जास्त काम करू शकत नव्हते. कारण मला तेव्हा माहित नव्हते की, पुढचा झटका मला केव्हा येईल. हे तब्बल १५ वर्ष असंच घडत होतं. परंतु आज मी या सगळ्यातून बाहेर पडले आहे. मला गर्व आहे की, मी हा पॅनिक अटॅक आणि चिंतेला एका मजबूत साहाय्याने सांभाळून घेतले.”
शेफालीने कोरोना महामारीत सकारात्मक राहण्याचा देखील सल्ला दिला. तिने सांगितले की, “महामारीची ही परिस्थिती कठीण आहे. परंतु मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम केले आणि त्या गोष्टींपासून दूर राहिले ज्या नकारात्मकता पसरवतात. मी ध्यान, योग, स्केचिंग, ड्रॉइंग आणि अन्य काही गोष्टींमध्ये माझे लक्ष केंद्रित केले होते, ज्या गोष्टी मला आनंदी ठेवतील. वर्कआउट आणि सकारात्मक लाईफ स्टाईलने माझी खूप मदत केली.”
शेफालीने काही वर्षांपूर्वी अनेक रियॅलिटी शोमध्ये काम केले आहे. ती ‘नच बलिये ५’ आणि ‘बिग बॉस १३’ मध्ये सहभागी झाली होती. तिने २०१८ मध्ये श्रेयस तळपदेसोबत अल्ट बालाजीची वेबसीरिज ‘बेबी कम ना’ मध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे.
हेही नक्की वाचा –