वाढत्या वयात आईने भेट दिले होते ‘सेक्स एज्युकेशन’चे पुस्तक; इरा खानने सोशल मीडियावर केला खुलासा


बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत असणाऱ्या रिलेशनमुळे खूप चर्चेत असते. त्या दोघांचे रोमँटिक अंदाजात अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. यातच तिने सांगितले आहे की, ती जेव्हा मोठी होत होती तेव्हा तिच्या आईने तिला सेक्स एज्युकेशनचे पुस्तक दिले होते.

इरा खानने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून या गोष्टीची माहिती दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला नाही वाटत की, मी आधी कधी माझे शरीर पूर्णपणे पाहिले आहे. जेव्हा मी मोठी होत होते, तेव्हा माझ्या आईने मला सेक्स एज्युकेशनचे एक पुस्तक दिले होते. त्यामध्ये स्वतःला आरशात पाहायला सांगितले होते. पण मी तसे केले नाही. माझे शरीर खूप बदलले आहे. एक लांबचा रस्ता ठरवायचा आहे.” तिने हा फोटो अगत्यु फाऊंडेशनला देखील टॅग केला आहे.

इरा खानने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अगत्यु फाऊंडेशन लॉन्च करण्याची घोषणा केली होती. जे मानसिक स्वास्थ्य संदर्भात जागरूकता निर्माण करणार आहे. इरा इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर करून म्हणाली होती की, “मी एक सेक्शन १८ कंपनी रजिस्टर केली आहे. जिचे नाव अगस्त्यु फाऊंडेशन आहे जी आज लॉन्च होत आहे.” (Aamir Khan’s daughter Ira khan given sex education book by her mother)

इराने या आधी देखील मानसिक स्वास्थ्य संदर्भात जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तिने डिप्रेशनमधील तिचा अनुभव देखील शेअर केला होता. अगस्त्यु फाऊंडेशन त्या लोकांसाठी काम करणार आहे ज्यांना कठीण प्रसंगात इतर कोणाच्यातरी मदतीची गरज असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

-राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

-आर्ची अन् परश्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र?? फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.