‘काटा लगा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री शेफाली जरीवला आजकाल सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. या दिवसात ती तिचा पती पराग त्यागी सोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवमधील सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. लाल बिकीनवर आपल्या पतीबरोबर मालदीवचे काही खास फोटो तीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत ते दोघे बाथ टॅबमध्ये बसलेले आहेत. दोघेही या फोटोत रोमँटिक मुडमध्ये दिसत असून सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोंना त्यांच्या फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.
शेफालीने ऑगस्ट 2014 मध्ये तिचा बॉयफ्रेंड पराग त्यागीसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. शेफालीचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न गायक हरमीत गुलजार याच्यासोबत झाले होते. पण 2009 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. शेफालीने स्वतः या गोष्टीची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर 2012 मध्ये तिने सांगितले की पवित्रा रिश्तामधील अर्चनाचा भाऊ म्हणजे पराग त्यागीसोबत ती डेट करत आहे.
2002 मध्ये तिचे काटा लगा हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले होते. या गाण्याने तिला खरी ओळख दिली. आजही हे गाणे सगळ्यांच्या ओठावर आहे. यानंतर ती चित्रपटसृष्टीत आली. तिने ‘मुझसे शादी करोंगी’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती.
हेही वाचा-
–अभिनेता हरमन बावेजा चढला बोहल्यावर! बांधली गर्लफ्रेंड साशा रामचंदानीशी लग्नगाठ, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
–मलायका अरोराची हॉटनेस पुन्हा चर्चेत; स्विमिंग पूलवरील फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा!
–‘ही तर जलपरी’ आलिया भट्टचा अंडरवॉटर बिकिनी फोटो पाहून चाहत्यांची झक्कास प्रतिक्रिया