Friday, April 26, 2024

अभिनेता हरमन बावेजा चढला बोहल्यावर! बांधली गर्लफ्रेंड साशा रामचंदानीशी लग्नगाठ, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजा रविवारी (21 मार्च) विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याच्या दीर्घ काळ गर्लफ्रेंड साशा रामचंदानीसोबत कोलकातामध्ये सात फेरे घेतले आहेत. या लग्नात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. हरमनच्या लग्नाचे बरेच फोटो अन् व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत आहेत.

लग्नाच्या या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये आपण पाहू शकतो की, हरमन बावेजाने ऑफ-व्हाइट आणि फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे. दुसरीकडे साशाने मरुन व सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या पोशाखात, तिने मॅचिंग दागिने आणि मरून रंगाच्या बांगड्याही घातल्या आहेत.

यापूर्वीच सोशल मीडियावर हरमन बावेजाच्या लग्नाच्या पूर्व सोहळ्याचे (pre wedding) फोटो व्हायरल झाले होते. आमिर अलीने हरमन बावेजाच्या हळदी सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये आमिर हरमनला हळद लावताना दिसत होता. राज कुंद्रानेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॉकटेल पार्टीचा फोटो शेअर केला होता. या खाजगी कार्यक्रमामध्ये फक्त 50-70 लोकांनाच बोलावले गेले होते.

याव्यतिरिक्त राज कुंद्राने हरमनच्या वरातीचाही व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘हरमनचा विवाह.’ तसेच, हरमनच्या कुटूंब्याव्यतिरिक्त राज कुंद्रा, आमिर अली, आशिष चौधरी आणि त्याची पत्नी समिता बंगार्गी या गाण्यावर नाचताना दिसले.

https://www.instagram.com/p/CMp5afyBgbM/?utm_source=ig_web_copy_link

याव्यतिरिक्तत शिल्पानेही हरमनच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

साल 2000 मध्ये आलेल्या ‘लव्हस्टोरी 2050’ या चित्रपटाद्वारे हरमन बावेजाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या लुक्समुळे त्याला ऋतिक रोशनचा डुप्लिकेटही म्हटले जायचे. सिनेसृष्टीत हरमनची एंट्री खूप धमाकेदार पद्धतीने झाली होती. हरमनचा पहिला चित्रपट ‘लव्ह स्टोरी 2050’ त्याचे वडील हॅरी बावेजा यांनीच दिग्दर्शित केला होता, तर साशा रामचंदानी ही आरोग्य तज्ञ आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! प्रियंका सिंग- नीलम गिरीचे नवीन गाणे रिलीझ, काही तासातच मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

-वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची सुरुवात करणाऱ्या ‘अलका याज्ञिक’, चक्क ओसामा बिन लादेनही बनला होता त्यांचा फॅन

हे देखील वाचा