Saturday, June 29, 2024

सारा अली खानला पाहिजे आंधळा – वेडा मुलगा? लग्नावरच्या प्रश्नावर अभिनेत्रीने साेडले माैन, व्हिडिओ व्हायरल

सारा अली खानला बी-टाऊनची ‘नवाबजादी’ देखील म्हटले जाते. नुकतेच या अभिनेत्रीचा ‘गॅसलाइट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटातील सारा अलीचा अभिनय लोकांना अजिबात आवडला नाही. चित्रपटांव्यतिरिक्त, सारा अली खान तिच्या अनाेख्या स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. अनेकवेळा तिचे मजेशीर बोलणे आणि व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. अलीकडेच जेव्हा सारा अली खानला तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने याबाबत मौन सोडले.

सारा अली खान ( sara ali khan) अलीकडेच शहनाज गिलचा चॅट शो ‘देसी वाइब्स’मध्ये ‘गॅसलाइट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली हाेती. यादरम्यान शहनाजने साराला मजेदार प्रश्न विचारले, ज्याला अभिनेत्रीने मनोरंजक उत्तरे दिली. यादरम्यान 27 वर्षीय सारा अली खाननेही खुलासा केला आहे की, ती कधी लग्न करणार आहे.

देसी वाइब्स विद शहनाड गिलमध्ये, शहनाजने साराला विचारले की, तिच्या लग्नाच्या काय योजना आहेत. यावर अभिनेत्री म्हणाली, “अजून पर्यंत तर नाहीत, शाेधावा लागेल एखादा आंधळा वेडा, जो माझ्याशी लग्न करू शकेल, आम्ही सध्या त्याच्या शोधात आहोत.” यावर शहनाजने तिला विचारले आंधळा वेडा असे का? यावर सारा म्हणाली, ‘मला वाटतं आंधळा वेडा आवश्यक आहे. कारण, जर त्याच्याकडे मेंदू असेल तर ताे मला झेलू शकनार नाही.’ या उत्तरानंतर शहनाज म्हणाली की, सारा अगदी तिच्यासारखीच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीचा ‘गॅसलाइट’ 31 मार्च 2023 रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटामध्ये सारा व्यतिरिक्त चित्रांगदा सिंग आणि विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहेत. गॅसलाइटशिवाय, सारा ‘जरा हटके जरा बचके’, ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मेट्रो’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.( shehnaaz gill asks actress sara ali khan for wedding plans she need andha pagal)

हे देखील वाचा