Sunday, April 14, 2024

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर स्वतःला नॉर्मल ठेवण्यासाठी शेहनाज करते ‘हा’ उपाय, स्वतःच केला खुलासा

अभिनेता आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मित मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूवर सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांनी हळहळ व्यक्त केली होती. मात्र सिध्दार्थच्या मृत्यूचा सर्वात जास्त प्रभाव पडला तो त्याची जवळची मैत्रीण असलेल्या शेहनाज गिलवर. शहनाजला सिद्धार्थच्या मृत्यूने मानसिक धक्का बसला होता. तेव्हापासून ती जणू गायबच झाली होती. सिद्धार्थ जाण्याच्या बऱ्याच काळानंतर शहनाजने तिच्या कामाला सुरुवात केली आहे.

शहनाजने बिग बॉसच्या घरात आपल्या बोलक्या, निरागस आणि खोडकर स्वभावाने सगळ्यांची मने जिंकली होती. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने जोरदार धक्का बसलेल्या शहनाजने बोलणेच बंद केले होते. खूप बडबड करणारी शहनाज तेव्हापासून अत्यंत शांत झाली होती. तिच्या चाहत्यांनाही तिच्यात झालेल्या या मोठ्या बदलामुळे तिची मोठी काळजी वाटत होती. मात्र, आता बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच शहनाजने आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शहनाजने आपल्या या कठीण परिस्थितीत ती स्वतःला कशाप्रकारे नॉर्मल ठेवते याचा खुलासा केला आहे. यामध्ये ती म्हणते की “मला मेडीटेशन करायला आवडत आणि मी ते रोज करते. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी तुम्ही मेडीटेशन केल्याने त्याचा काहीही प्रभाव जाणवणार नाही” यामध्ये शहनाज खूपच उत्साही दिसत आहे.

अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना शहनाजने सध्या ती एका जाहिरातींचे शूट करत असून त्यामधील तिचे आवडते काम म्हणजे मेकअप करत असल्याचं तिने सांगितले. यावेळी तिने डिस्नेचे चित्रपट करण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. नुकताच तिचा बिग बॉसच्या कार्यक्रमात प्रसिद्ध झालेल्या डायलॉगवर ‘boring day boring people’ नावाचा व्हिडिओ समोर आला होता. सध्या तो जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान शहनाज गिलने बिग बॉसच्या 13 व्या पर्वात सहभाग नोंदवला होता. याच कार्यक्रमात तिची आणि या पर्वाचा विजेता सिद्धार्थ शुक्लाची घनिष्ठ मैत्री झाली होती दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही त्याकाळात सुरू होती. मात्र गेल्या वर्षी २ सप्टेंबरला सिद्धार्थ शुक्लाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता, ज्यामुळे शहनाजवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आता पहिल्यासारखी पुन्हा सक्रिय झाल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. (shehnaaz gill back to normal life bts video viral boring day boring people)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच

‘तो आणि मी…’, पंकज त्रिपाठी यांनी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा

हे देखील वाचा