Saturday, April 20, 2024

Siddharth Shukla |बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच

Siddharth Shukla | टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (siddharth shukla) वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला लोकांचा आवडता कलाकार होता. ‘बिग बॉसचा विजेता’ झाल्यानंतर त्याच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स होते. पण तो अशाप्रकारे निघून जाईल असे कोणालाच वाटले नव्हते. तो दोन मोठे बॉलिवूड चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला होता. अतिशय फिट आणि फाईन असणारा सिद्धार्थ अशी अकाली एक्सिट घेईल असे कोणालाही वाटले नव्हते. अशातच आज त्याची जयंती आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया सिद्धार्थची एकूण संपत्ती.

सिद्धार्थ प्रत्येक प्रोजेक्टच्या हिट ग्यारंटी बनलेल्या सिद्धार्थ शुक्लाचे निधन ही हे कोणालाही पचवता येत नाहीये. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर या ग्लॅमर जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आणि एक यशस्वी कलाकार म्हणून तो समोर आला. सिद्धार्थ जसा यश मिळवत गेला तशी त्याची लोकप्रियता वाढली आणि सोबतच तो आर्थिक स्थैर्य मिळवत गेला. त्याने कोट्यावधींची संपत्ती कमावली होती. आज सिद्धार्थने जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्याने त्याच्या मागे करोडो रुपयांची संपत्ती सोडून गेला आहे.

एका वेबसाईटनुसार, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची निव्वळ संपत्ती $ 1.5 दशलक्ष आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 11.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याची जास्त कमाई टीव्ही शो आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून व्हायची. तो महिन्याला 10 लाखांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करायचा. यासोबतच सिद्धार्थचे मुंबईत एक आलिशान घर आहे. ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबासह राहत होता. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याने हे घर खरेदी केले. त्याची आई देखील त्याच्यासोबत याच घरात राहत होती. सिद्धार्थ शुक्लाचा याच घरातमध्ये मृत्यू झाला.

सिद्धार्थ शुक्लाला गाड्यांची प्रचंड आवड होती. त्याच्याकडे अनेक महागड्या आणि लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यात बीएमडब्ल्यू एक्स 5 होती. हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉब टु व्हीलर आहे. एकदा त्याच्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला होता, ज्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला जावे लागले.

सिद्धार्थने ‘झलक दिखला जा’, ‘सावधान इंडिया’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ यांसारख्या अनेक रियॅलिटी शोमध्ये काम केले.  ‘खतरों के खिलाडी सीझन 7’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाला 25लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली होती. सिध्दार्थ शुक्ला त्याच्या कमाईचा काही भाग दान करायचा. लोकांच्या मदतीसाठी तो नेहमी पुढाकार घ्यायचा. पण कदाचित नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि सिद्धार्थने या जगाला निरोप घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तो आणि मी…’, पंकज त्रिपाठी यांनी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा

‘सरकारणं माझ्या आईला पद्मश्री दिला पण …’, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत

हे देखील वाचा