×

काय सांगता! शहनाज गिल ‘भाईजान’सोबत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? जाणून घ्या पूर्ण प्रकरण

अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ‘बिग बॉस १३’पासून चांगलीच चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’मध्ये शहनाजने आपल्या सहजसुंदर कृतीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिच्या फोटोंची आणि व्हिडिओंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. आत्तापर्यंत ओटीटी फ्लॅटफॉर्म आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये झळकलेली शहनाज आता लवकरच सुपरस्टार सलमान खानसोबत (Salman Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कभी ईद कभी दिवाली असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटात शहनाजचीही भुमिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

‘बिग बॉस १३’ फेम शहनाज गिलने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही, परंतु तिची लोकप्रियता कोणत्याही मोठ्या स्टार्सपेक्षा कमी नाही. सध्या तिला एकामागून एक मोठमोठ्या ऑफर्स येत आहेत. यापूर्वी कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ या रियॅलिटी शोमध्ये शहनाज दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये पूजा हेगडे (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत आहे. यात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा (Ayush Sharma) देखील आहे.

शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याची बातमी समजताच अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सलमान खानसोबतचे तिचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात आयुषसोबत शहनाज दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा चित्रपट २०२२ च्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि फरहाद सामजी यांनी केली आहे.

सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘कभी ईद कभी दिवाली’ व्यतिरिक्त इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो लवकरच कॅटरिना कैफसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात इमरान हाश्मी देखील आहे. पुढील वर्षी २१ एप्रिल २०१३ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post