हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी आणि चर्चेत अभिनेते म्हणून ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिने जगतात आपल्या कर्तुत्वाची मोहोर उमटवली होती. आजही त्यांच्या चित्रपटांची चर्चा होताना दिसत असते. ऋषी कपूर यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिने जगताला मोठा धक्का बसला होता. अभिनेते ऋषी कपूर यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. दोन वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. ते कर्करोगाशी झुंज देत होते आणि जवळपास दोन वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऋषी कपूर हे असे अभिनेते होते ज्यांनी चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आणि अनेक चित्रपटांमध्ये दिसले. पाहूया त्यांच्या खास कारकिर्दिबद्दल.
बॉलिवूड सिने जगतातील पहिले रोमँटिक हिरो म्हणून ऋषी कपूर यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ८०-९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. या काळात त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले होते. बॉलिवूड जगतातील सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्यांनी चित्रपटात काम केले आहे. आपल्या करिअरमध्ये जवळपास 121 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ऋषी यांनी 50 वर्षे चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे त्याने 92 रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी ‘कर्ज’, ‘दीवाना’, ‘चांदनी’, ‘सागर’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘हम किसी से कम नहीं’, ‘प्रेम रोग’, ‘हिना’ यासह 36 चित्रपट सुपरहिट ठरले होते.
ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूरसोबत ही जोडी पडद्यावर खूप प्रसिद्ध होती. दोघांनी जवळपास 12 चित्रपटात एकत्र काम केले. त्यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात हिट जोडप्यांपैकी एक मानली जात होती. दोघांनी खेल खेल में, कभी कभी, अमर अकबर अँथनी, दुनिया मेरी जब में असे अनेक हिट चित्रपट दिले. आ अब लौट चलें या चित्रपटात अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शनातही त्यांनी हात आजमावला. त्याच वेळी, त्यांनी हृतिक रोशन स्टारर अग्निपथमध्ये खलनायकाची भूमिका करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शर्मा जी नमकीन हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला जो त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रदर्शित झाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- अर्शी खानने दुबईत केला साखरपुडा? अभिनेत्रीने सांगितले व्हायरल बातमीमागील सत्य
- पुण्यतिथी | करोडोंची संपत्ती असलेल्या अचला सचदेव यांची अखेरच्या क्षणी होती अशी अवस्था, रुग्णालयातच गेला होता जीव
- हिंदी भाषेच्या वादावर कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य, म्हणाली ‘तमिळ ही हिंदीपेक्षा जुनी भाषा आहे पण…’