Saturday, June 29, 2024

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाझ गिलने तोडले मौन; म्हणाली, ‘तो परत आलाय…’

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनाला जवळजवळ ५ महिने पूर्ण झाले आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर शहनाझ गिल (Shehnaaz Gill) पूर्णपणे तुटून गेली होती. पण आता ती हळूहळू स्वतः ला सावरत आहे. यादरम्यान शहनाझने अलीकडेच ब्रह्मकुमारी बीके शिवानीला मुलाखत दिली. या संवादात शहनाझने सिद्धार्थ शुक्लाबद्दलही एक मोठी गोष्ट सांगितली.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाझ पहिल्यांदाच त्याच्याबद्दल उघडपणे बोलली आहे. शहनाझने हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. सिस्टर शिवानीशी बोलताना शहनाझ म्हणाली, “मी सिद्धार्थला नेहमी सांगायचे की मला शिवानी बहिण खूप आवडते. मला त्यांच्याशी बोलायचे आहे. तो मला सांगायचा की, एक दिवस तू नक्की बोलशील… चिल कर.” (shehnaaz gill break silence on sidharth shukla death says he is back)

शहनाझ पुढे म्हणाली, “मी २ वर्षात खूप काही शिकले. मी प्रत्येक गोष्ट खंबीरपणे हाताळू शकते. आमचा प्रवास अजूनही सुरू आहे, त्याचा प्रवास पूर्ण झाला आहे. त्याचे कपडे बदलले आहेत, पण तो कुठेतरी आला आहे.”

शहनाझ गिलने सिस्टर शिवानीला सिद्धार्थ शुक्लाचा संदर्भ देत म्हटले, “त्याचा चेहरा बदलला आहे, परंतु, तो पुन्हा या रूपात आला आहे. त्याचा संपर्क माझ्याकडे सध्या बंद झाले आहे आणि कदाचित तो पुन्हा कधीतरी चालू होईल.”

‘रडल्याने फक्त त्रास वाढतो’
शहनाझ पुढे म्हणाली, “एखाद्यासाठी रडल्याने केवळ वेदना वाढतात. त्या कधीही कमी होत नाही. कोणी ना कोणी जातोच. पण आपण विचार केला पाहिजे की, आपल्याला राहायचे आहे. मी अजून इथे नाही. पूर्वी मी शरीराने अधिक आरामदायक होते, पण आता मी आत्म्याने अधिक आरामदायक आहे.”

रीता आंटीने सांभाळले शहनाझला
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाझ तुटली होती. त्यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये शहनाझ वाईट अवस्थेत दिसत होती. हे फोटो पाहून शहनाझ स्वत:ला कशी सांभाळेल, असे वाटले. पण त्यावेळी सिद्धार्थची आई रीता आंटीने स्वतःची काळजी तर घेतलीच, पण सिद्धार्थवर खूप प्रेम करणाऱ्या शहनाझचीही काळजी घेतली.

हेही वाचा :

मायरा वैकुळने ‘केळेवाली’ गाण्यावर केला असा डान्स की, सोनाली कुलकर्णीने देखील केली भन्नाट कमेंट

विवाहित असून पवन सिंग करत होता एक्स गर्लफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त, विवादात होती गायकाची लव्हलाईफ

जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

 

हे देखील वाचा