Wednesday, July 3, 2024

‘सिद्धार्थ मेरा बच्चा…’, म्हणत धाय मोकलून रडू लागली शहनाझ; अभिनेत्याला अग्नी देताना वाईट झाली होती तिची हालत

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अनपेक्षित मृत्युने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. यासोबत त्याच्या जवळची मैत्रीण शहनाझ गिल हिच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात त्या दोघांची मैत्री झाली होती. त्यांची ही मैत्री सिद्धार्थ शुक्लाच्या शेवटच्या क्षणापर्यंत घट्ट होती. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना एवढी आवडली होती की, प्रेक्षकांनी त्यांना ‘सिडनाझ’ हे नाव दिले होते. ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. शहनाझ सिद्धार्थला तिच्या कुटुंबातील एक मानायची. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने सांगितले होते की, सिद्धार्थ तिच्यासाठी बॉयफ्रेंडपेक्षाही जास्त आहे.

‘बिग बॉस’ स्पर्धक संभावना शेठ ही शुक्रवारी (३सप्टेंबर) सिद्धार्थच्या अंतिम विधीला पोहचली होती. आता माध्यमांशी बोलताना तिने शहनाझ गिलच्या अवस्थेबद्दल सांगितले. संभावनाने सांगितले की, “सिद्धार्थ शुक्लाला अग्नी देण्याच्या वेळेस शहनाझ पूर्णपणे तुटून गेली होती. अंतिम विधी करताना ‘सिद्धार्थ मेरा बच्चा’ असे ती म्हणत होती. (Shehnaaz gill breaks down at late actors funeral saying Sidharth mera bachcha reveals sambhavana Sheth)

https://www.instagram.com/p/CTW0PRECHXG/?utm_source=ig_web_copy_link

तिने सांगितले की, “सिद्धार्थच्या चितेला अग्नी देण्याच्या आधी त्याच्या अंतिम दर्शनसाठी त्याचे पार्थिव काही वेळ ठेवण्यात आले होते. यावेळी शहनाझ पूर्ण वेळ पायांवर बसलेली होतो. त्यानंतर ती सगळ्या विधींमध्ये देखील सामील झाली होती.”

https://www.instagram.com/p/CTW2pHZiRAd/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CTWsRWiiylE/?utm_source=ig_web_copy_link

संभावना शेठने सिद्धार्थ शुक्लाच्या आईबद्दल देखील सांगितले. तिने सांगितले की, “सिद्धार्थच्या आई खूप भावुक झाल्या होत्या. परंतु तरीही त्या कठोर बनण्याचा प्रयत्न करत होत्या. या प्रसंगातून जाणे त्यांच्यासाठी अजिबात सोप्पे नव्हते.” अशातच माध्यमातील वृत्तानुसार, सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल हे दोघे २०२१ मध्ये लग्न करण्याचे प्लॅनिंग करत होते. दोघांनीही याबाबत त्यांच्या परिवाराला माहिती दिली होती. त्यानंतर दोघांनी लग्नाची तयारी देखील सुरू केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा