Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर एकाच वर्षात शहनाज बनली नवरी, सोशल मीडियावर व्हि़डिओ तुफान व्हायरल

पंजाबची कॅटरिना कैफ (Katrina Kaif) म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिलने (Shehnaaz Gill) मनोरंजन जगतात अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. बिगबॉस १३ मधून सर्वत्र लोकप्रिय झालेली शहनाज गिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. यावरुन ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या शहनाज गिलचा असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती नववधुच्या पेहरावात रॅम्पवॉक करताना दिसत आहे. शहनाज गिलच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहते चांगलेच घायाळ झाल्याचे दिसत आहे. 

अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या आगामी ‘कभी इद कभी कभी दिवाली’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. थेट सलमान खानसोबत आपले बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या शहनाजच्या या आगामी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्याआधी शहनाज गिलच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.ज्यामध्ये अभिनेत्री शहनाज गिल नववधूच्या पेहरावात खूपच मनमोहक दिसत आहे.  हा व्हिडिओ एका फॅशन शोमधील आहे ज्यामध्ये शहनाजने रॅम्पवॉकमधील असल्याचे शहनाजने सांगितले आहे.

https://www.instagram.com/tv/Ce_9jwphDvV/?utm_source=ig_web_copy_link

चित्रपट जगतात पदार्पण करण्याआधी शहनाजने फॅशनच्या जगतात पदार्पण करणार आहे.अहमदाबादमधील फॅशन डिझायनर समंत चौहान यांच्यासाठी शहनाजने रॅम्पवॉक केले आहे. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये लाल साडी आणि कपाळावर बिंदी लावलेली शहनाज खूपच मनमोहक दिसत आहे. या लूकवर तिने महागडे दागिने घातले आहेत ज्यामुळे तिच्या या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे. दरम्यान चित्रपटाच्या आधीच शहनाजच्या या रॅम्पवॉकने सर्वांनाच घायाळ केल आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

हिरोईन, आई, आजी अशा विविध भूमिका साकारून ‘या’ अभिनेत्रीने मिळवले यश, वाचा तिची संघर्षमय कहाणी

दगडी चाळ २ : पुन्हा एकदा सिनेमागृहात रंगणार दगडी चाळीचा थरार, डॅडींच्या चित्रपटाचा जबरदस्त टिझर पाहाच

रश्मीका मंदानाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘पुष्पा २’ मध्ये होणार श्रीवल्लीचा मृत्यू

हे देखील वाचा