Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन शहनाज गिलची दिवानगी करतेय हद्द पार! जोशमध्ये येऊन एका फॅनने केलं ‘असं’ कृत्य

शहनाज गिलची दिवानगी करतेय हद्द पार! जोशमध्ये येऊन एका फॅनने केलं ‘असं’ कृत्य

अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ‘बिग बॉस’च्या घरातून आल्यापासून तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणार्‍या शहनाजचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे. तिचे चाहते तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. आता शहनाजच्या अशाच एका कट्टर चाहत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊ.

पंजाबची कॅटरिना कैफ अशी ओळख असलेल्या शहनाज गिलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या सौंदर्याने आणि बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांची मने जिंकली आहेत. तिच्यासाठी तिचे चाहते काहीही करायला तयार असतात. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तरुणी शहनाजच्या नावाचा टॅटू काढताना दिसत आहे.

शहनाज गिलची चाहती असलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तरुणी आपल्या छातीवर शहनाजचे नाव कोरताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ शहनाजच्या फॅनक्लब मार्फत शेअर केला गेला आहे. ही तरुणी नेपाळची असल्याचेही या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत या तरुणीने शहनाजसाठी एक संदेश सुद्धा लिहिला आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, “मी तुमच्यावर सदैव प्रेम करत राहीन. कायम तुम्हाला सपोर्ट करेन. मी कायमचे माझ्या हृदयावर तुमचे नाव कोरले आहे. हे नाव ‘बिग बॉस १३’पासून कोरले गेले आहे आणि आता ते कायमस्वरूपी राहील.” या जबरदस्त चाहती असलेल्या तरुणीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शहनाजचे चाहते या व्हिडिओला पसंती दर्शवत आहेत. तसेच अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दरम्यान शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा पाहायला मिळाली आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाजनला मोठा धक्का बसला होता ज्यातून आता ती हळूहळू सावरत आहे. शहनाज आता तिच्या नवीन गाण्यामध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा