Friday, March 29, 2024

सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यावर बोलली शहनाज गिल; म्हणाली, ‘ज्याप्रकारे त्याने माझ्यावर प्रेम केले… ‘

अभिनेत्री, मॉडेल आणि ‘बिग बॉस १३’ फेम शहनाज गिलने या शोनंतर घरोघरी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली आहे. शहनाज आता सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. या वादग्रस्त रियॅलिटी शोमध्ये आल्यानंतर ही बबली आणि विनोदी शहनाज चाहत्यांची आवडती बनली. यासोबतच शोचा विजेता असणाऱ्या सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची मैत्रीही खूप चर्चेत होती. शहनाज आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची बॉंडिग अजुनही चर्चेत असते.

‘बिग बॉस १३’ च्या दरम्यान त्यांची मैत्री चर्चेत होती. शो दरम्यान, शहनाझने सिद्धार्थवरील आपले प्रेम टेलिव्हिजनवर व्यक्त केले. शोनंतरही त्यांची मैत्री कायम आहे. मात्र, त्यांच्या चाहत्यांना वाटते की ते रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच, अभिनेत्री ‘सोशल मीडिया स्टार विथ जेनिस सिकीरा’ या टॉक शोमध्ये दिसली, त्यावेळी ती ‘सिडनाज’बद्दलही बोलली. (shehnaaz gill talks about her bond with sidharth shukla says sidnaaz is still a thing because it is genuine)

होस्टशी बोलताना शहनाज म्हणाली, “सिडनाज अजूनही एक गोष्ट आहे आणि त्यामागचे सर्वात मोठे रहस्य हे आहे की, ती खरी आहे. आमच्यात एक चांगले नाते आहे. मला वाटते की लोक त्याच्याशी जोडलेले आहेत. ज्याप्रकारे त्याने माझ्यावर प्रेम केले आणि माझ्यावरचे प्रेम दाखवले ते मला खरोखर आवडले. आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल सारख्याच भावना आहेत. तो खूप प्रेमळ आहे. मी स्वतः सहमत आहे की, त्याच्याशी माझे नाते वेगळे आहे. तो माझ्या कुटुंबासारखा आहे.”

शोनंतर, सिद्धार्थ आणि शहनाज दर्शन रावलच्या ‘भुला दूंगा’ आणि टोनी कक्करच्या ‘शोना शोना’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले. ते त्यांच्या प्रेम आणि मैत्रीवर आधारित ‘सिलसिला सिडनाज का: ए मॉडर्न फेयरीटेल’मध्ये देखील झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा