Monday, July 1, 2024

शहनाझ गिल अन् माधुरी दीक्षितचा ‘बडी मुश्किल’ गाण्यावर अफलातून डान्स; धमाल व्हिडिओ व्हायरल

टेलिव्हिजनवरील ‘डान्स दीवाने’ हा शो जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक पाहुणे येत असतात. तसेच एखाद्या स्पेशल थीमवर परफॉर्मन्स केले जातात. अशातच मागील आठवड्यात लव्ह ही थीम होती. यानिमित्त डान्स दीवानेच्या मंचावर ‘बिग बॉस १३’ ची लोकप्रिय जोडी आणि लव्ह बर्ड्स शहनाझ गिल व सिद्धार्थ शुक्ला यांनी हजेरी लावली होती. या मंचावर त्या दोघांचे दणक्यात स्वागत झाले. तसेच त्यांनी डान्स देखील केला. अशातच शहनाझ गिल आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

शहनाझने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती माधुरी दीक्षितसोबत ‘बडी मुश्किल’ या गाण्यावर भन्नाट एक्सप्रेशन्स आणि डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या दोघीही अत्यंत सुंदर दिसत आहेत. माधुरीने आकाशी रंगाचा ड्रेस घातला आहे तर शहनाझने काळ्या आणि निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्या दोघींचा हा डान्स व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे . ( Shehnaaz gill dance with Madhuri Dixit on dance deewane stage)

अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ३ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी देखील तिने तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिचे चाहते नेहमीच तिचे पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात.

शहनाझ गिल या आधी बादशाहसोबत ‘फ्लाई’ या गाण्यात दिसली होती. या आधी देखील ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. ‘बिग बॉस १३’ मध्ये तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तिला अनेक प्रोजेक्टच्या ऑफर आल्या. ती लवकरच ‘हौसला रख’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग कॅनडामध्ये पूर्ण झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

हे देखील वाचा