Wednesday, July 3, 2024

गुरु रंधावसोबतची मस्ती शहनाझला पडली महागात, पळता पळता पडली धपकन अन्…

‘बिग बॉस’ फेम शहनाझ गिल सतत आपल्या फोटो आणि व्हिओमुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. सध्या अभिनेत्री पंजाबी गायक गुरु रंधावा याच्या सोबत नवीन गाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे. यांच आगामी येणारं गाणं ‘मून राइज’ लवकरच प्रेक्षकंच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या गाण्याच्या शुटींगवेळीचा
एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये शेहनाज आणि गुरुची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरी आहे.

लोकप्रिय अभिनेत्री शहनाझ गिल (Shehnaaz Gill) आणि पंजाबी गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) लवकरच ‘मून राइज’ ( Moon Rise) हे नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या गाण्याच्या शुटींगचा एक धमाकेदार व्हिडिओ टी सिरिजने आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये शहनाज समुद्र किनाऱ्यावर पळताना दिसून येत असून तिच्या मागे गुरु रंधावा पळत आहे, अशातच शेहनाझचा तोल जातो आणि पडते. यानंतर गुरु तिला उचलतो आणि दोघेही जोरजोरात हसतात.

 

View this post on Instagram

 

गरु रंधाव आणि शहनाझ गिल यांची केमिस्ट्री मात्र, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, “दोघेही सोबत एकत्र खूपच छान दिसत आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, “दोघांची केमिस्ट्री जादू आहे.” तर एका अन्यने लिहिले की, शहनाझ आणि गुरु रंधावासोबत अनेक व्हिडिओपाहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शेहनाझ आणि गुरुच्या या व्हिडिओला 64 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

यापूर्वी देखिल गुरु आणि शेहनाझचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका सीनच्या शुटिंगवेळी शेहनाझ लाल रंगाच्या कट गाऊनमध्ये दिसली तेव्हा अभिनेता तिचा पाय झाकतो मात्र, शेहनाझ त्याने झाकेला फ्रॉक सरकवते आणि म्हणते की, ही फॅशन आहे. हे पाहिल्यानंतर गुरु लाजून लाल होतो. त्यांच्या या व्हिडिओने देखि सोशल मीडिवर क्रेज केली होती. शेहनाझ आणि गुरु रंधावा यांचं मून राईज हे गाणं (दि, 10 जानेवारी) रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतापासून ब्रिटन ते अमेरिकेपर्यंत होता ‘या’ अभिनेत्याचा डंका, बॉलिवूडचा एकही ऍक्टर मोडू शकला नाही त्यांचा विक्रम
‘काय वेडी आहेस तू’ म्हणत रितेश देशमुख भांडला ‘या’ अभिनेत्रीशी, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा