Wednesday, April 17, 2024

हा कसला फायर, हा तर फ्लॉवर! शहनाझने मांडीवरून गाऊन सरकवताच लाजून लाल झाला गुरु रंधावा

सोशल मीडियावर कलाकारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही वेळा पुरुष कलाकाराच्या एखाद्या कृतीमुळे अभिनेत्री लाजून लाल झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात अभिनेत्रीच्या एका कृतीमुळे प्रसिद्ध गायक लाजताना दिसत आहे. खरं तर, हा व्हिडिओ प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा आणि अभिनेत्री शहनाझ गिल यांचा आहे. या दोघांचाही हा बीटीएस व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

गुरु रंधावाने शेअर केला व्हिडिओ
गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) आणि शहनाझ गिल (Shehnaaz Gill) यांचा हा व्हिडिओ सेटवरचा आहे. यामध्ये गुरु आणि शहनाझ एकत्र बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहेत. असे वाटत आहे की, ते दोघेही कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. गुरु रंधावाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा तुम्ही शूट करत असता, तेव्हा तुम्हाला फक्त शहनाझ गिलकडे पाहण्याचीच परवानगी आहे. 10 जानेवारी, 2023 रोजी चंद्र उगवेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

गुरु रंधावा आणि शहनाझ गिल यांनी एकत्र केले फोटोशूट
खरं तर, दोघेही समुद्रकिनारी फोटोशूट करताना दिसत आहेत. याक्षणी एकीकडे गुरू सूटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, शहनाझ गिल हिने थाय हाय स्लिट गाऊन परिधान केला आहे. व्हिडिओत गुरु रंधावा गाऊनने शहनाझची मांडी झाकण्याचा प्रयत्न करतो, पण ती पुन्हा तो गाऊन बाजूला सारते. तसेच, जेव्हा ती गुरुकडे रोमँटिक अंदाजात पाहते, तेव्हा गायकाला हसू फुटते.

शहनाझचा व्हिडिओ व्हायरल
गुरु रंधावा आणि शहनाझ गिल (Guru Randhawa And Shehnaaz Gill Video) यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 3 तासांच्या आत 58 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 9 लाखांचा पाऊसही पडला आहे. याव्यतिरिक्त व्हिडिओवर 12 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

अनेकांनी या व्हिडिओवर लव्ह आणि फायर इमोजींचा वापर केला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “सिडनंतर सनासाठी हाच चांगला वाटतो.” दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “मला वाटते की, गुरु शहनाझसाठीच बनला आहे.” आणखी एकाने अशी कमेंट केली की, “दोघेही एकत्र खूप चांगले दिसत आहेत.” याव्यतिरिक्त एक जण असेही म्हणाला की, “यार तुम्ही दोघे एकमेकांसोबत खूप चांगले वाटता.”

शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या नात्याची चर्चा
विशेष म्हणजे, शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या नात्याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, सर्वकाही व्यवस्थित सुरू असतानाच सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ ‘बिग बॉस 13’मध्ये झळकला होता. आता मागील गोष्टींना मागेच ठेवत शहनाझने पुढचे पाऊल टाकले आहे. ती आता सिनेमातही झळकणार आहे. याव्यतिरिक्त ती पॉडकास्ट मुलाखती घेतानाही दिसत आहे. तसेच, अभिनेत्रीचे अनेक म्युझिक व्हिडिओही येऊ घातले आहेत, ज्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत. (actress Shehnaaz Gill makes Guru Randhawa blush, asks him to look at her face and not cover up her dress at shoot)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदनान सामीने कसे कमी केले होते 130 किलो वजन? 51 वर्षीय गायकाने स्वत:च केला खुलासा
‘आम्ही आवाहन करतो की, चाहत्यांनी…’, पंतला भेटल्यानंतर बॉलिवूड दिग्गजांची कळकळीची विनंती

हे देखील वाचा