Saturday, July 6, 2024

गॉर्जियस शेहनाज गिलचे स्टनिंग फोटोशूट व्हायरल; पाहायला मिळाला ट्रान्सफॉर्मेशननंतरचा ग्लॅमरस लूक

‘बिग बॉस’ हा शो जरी त्यात होणाऱ्या वादांसाठी प्रसिद्ध असला, तरी त्यात सहभागी होणारे सर्व स्पर्धक मोठ्या प्रमाणत प्रकाशझोतात येतात. बिग बॉसमुळे मिळणारी लोकप्रियता कलाकरांना पुन्हा ग्लॅमरच्या प्रवाहात आणते आणि त्यांना प्रसिद्धीसोबतच कामही मिळवून देण्यास मदत करते. बिग बॉसच्या १३ व्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. या शोनंतर ती रातोरात स्टार बनली.

बिग बॉसमध्ये आल्यानंतर पंजाबी अभिनेत्री आणि गायिका असणारी शेहनाज चांगलीच हिट झाली. संपूर्ण देशात तिला नवीन ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात क्युट आणि गोडगोंडस दिसणारी शहनाज आता चांगलीच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे. नुकतेच शेहनाजने डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकले असून, या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

या फोटोमध्ये शेहनाजने न्यूड बेज कलरचा स्कर्ट आणि ब्रालेट घातले असून, या अवतारात शहनाज खूपच स्टनिंग दिसत आहे. तिच्या ड्रेसवर फ्लोरल एंब्रॉयड्री वर्क केले असून, सटल मेकअप आणि सिडक्टिव एक्सप्रेशन्स, विंग आईलाइनर, मिनिमल मेकअप, मॅचिंग ईयरिंग्स, शॉर्ट वेवी हेयर्स तिच्या लूकला चार चाँद लावत आहे. तिचे हे फोटो खूपच कमी काळात व्हायरल झाले आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिने स्वतःवर काम करण्यास सुरुवात केली. तिने काही महिन्यातच १२ ते १३ किलो वजन कमी केले आहे.

नुकताच तिला इकोनोमी टाइम्सने Promising Face Award देऊन सन्मानित केले आले. शेहनाज फिल्मफेयरच्या मासिकावर देखील झळकली आहे. शहनाज लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘हौसला रख’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती सिद्धार्थ शुल्कासोबत एका प्रोजेक्टवर काम करत असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा