Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड फिटनेस ट्रेनर विना शहनाझ गिलने केला मोठा बदल, सांगितल्या तिच्या फिटनेसच्या घरगुती ट्रिक्स

फिटनेस ट्रेनर विना शहनाझ गिलने केला मोठा बदल, सांगितल्या तिच्या फिटनेसच्या घरगुती ट्रिक्स

शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही हिंदी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून सध्या चर्चेत आहे. पंजाबची कॅटरिना अशी ओळख असलेल्या शहनाज गिलच्या गोड आवाजाचे आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. एक हरहुन्नरी, हळव्या मनाची गोड अभिनेत्री अशीच प्रत्येकाच्या मनात शहनाज बद्दलची खास प्रतिमा निर्माण झाली आहे. सध्या इंडस्ट्रीत फिटनेस क्वीन अशी ओळख असलेल्या शेहनाजने दुसऱ्यांकडे फिटनेस ट्रेनर असतो ते बघून मला वाईट वाटायचे असे मत व्यक्त केले होते याबद्दलचा आपला अनुभवही तिने यावेळी बोलून दाखवला होता. काय म्हणाली ती नेमकी चला जाणून घेऊ. 

क्यूटनेस क्विन शहनाज गिल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ‘बिग बॉस १३’ मध्ये शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या मैत्रीची सर्वत्र चर्चा झाली होती. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने शहनाजला मोठा धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूनंतर मानसिक धक्का बसलेली शहनाज डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावरील हसू जणू गायबच झाले होते. आपल्या प्रिय मित्राच्या अवेळी जाण्याने धक्का बसलेल्या शहनाजची अवस्था तिच्या चाहत्यांना बघवत नव्हती. मात्र आता या धक्क्यातून सावरत शेहनाज पून्हा एकदा अनेक कार्यक्रमात आणि चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. आपल्या फिटनेसमुळेही ती सध्या सर्वत्र चर्चेत असते. याबद्दलचा खुलासा तिने शिल्पा शेट्टीच्या शेफ ऑफ यू कार्यक्रमात केला होता.

यावेळी शेहनाजने सांगितले की, “मी घरी राहूनच माझे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी मला वाटायचे की अभिनेत्री किती नशीबवान असतात त्यांच्याकडे ट्रेनर असतो. आपल्याकडे तसं काहीच नाही. पण तरीही मी माझे वजन कमी केले. तुम्हाला घराबाहेर पडता येत नसेल तर तुम्ही घरातच फिरू शकता. सलवार सूट घालूनही व्यायाम करु शकता. मी असेच माझे वजन कमी केले. या काळात मी चहा पिऊन दिवसाची सुरूवात करायचे. फळ खायचे. विशेष काही बदल न करता मी नेहमीचाच आहार घेऊन वजन कमी केले. यामध्ये हरबरा, मेथीची भाजी या आहाराचा समावेश होता.” शेहनाज गील सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

 

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा