×

शेहनाज गिलने पुन्हा घेतला सोशल मीडियापासून ब्रेक? #WemissUShehnaaz हॅशटॅग झाला व्हायरल

बिग बॉस १३ नंतर अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) तुफान लोकप्रिय झाली. ‘पंजाबची कॅटरिना कैफ’ म्हणून तिला एक नवीन आणि मोठी ओळख मिळाली. आपल्या सुंदरतेने आणि निरागस गोष्टींमुळे तिने लोकांमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली. बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शेहनाज गिल यांच्या खास नात्यासाठी देखील तिला तुफान ओळख मिळाली. सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाज मोठ्या प्रमाणावर नैराश्यात गेली होती. त्यांनी कधीही त्यांचे नाते जगासमोर स्वीकारले नसले तरी त्यांचे फॅन्स त्यांना सिडनाज नावाने संबोधायचे. सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाज सोशल मीडियापासून लांब गेली होती. मात्र काही दिवसांनी ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली.

आता पुन्हा एकदा शेहनाज चर्चेत येण्याचे कारण म्हणजे मागील एक आठवड्यापासून शेहनाज गिल सोशल मीडियावरून गायब आहे. तिच्या या अशा अचानक गायब होण्यामागे तिचे फॅन्स अनेक प्रश्न विचारत आहे. शेहनाज गिलला इंस्टाग्रामवर जवळपास ११ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर असून, ट्विटरवर देखील तिला मोठ्या प्रमाणावर फॅन्स फॉलो करतात. एक आठवड्यापूर्वी शेहनाजने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता, त्यानंतर ती सोशल मीडियावरून गायब आहे. तिला सोशल मीडियावर फॅन्स सतत कमेंट्स करत ती कुठे आहे? ती सोशल मीडियावरून गायब का झाली असे विचारत आहे. ट्विटरवर तर फॅन्स तिचे फोटो शेअर करत #WemissUShehnaaz हा हॅशटॅग देत आहेत.

एका युझरने तिचा फोटो शेअर करत लिहिले, “कधी अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला @ishehnaaz_gill ची झलक पाहायला मिळाली नाही आणि तुम्हाला असे वाटत आहे की, सर्व काही सिंकच्या बाहेर आहे? माझ्यासाठी हा आठवडा असाच राहिला आहे. #ShehnaazGill कोणत्याही गोष्टीला अविस्मरणीय अनुभव बनवू शकते. आशा करतो की, ती लवकरच परत येईल. #WeMissUShehnaaz.” अजून एकाने लिहिले आहे, “बेबी काहीतरी पोस्ट करत…तू काही पोस्ट करत नाहीस तेव्हा तुझ्या शहनाजियोंला बेचैन वाटते. #WeMissUShehnaaz’”

शेहनाजने तिचा शेवटचा व्हिडिओ आठवडाभरापूर्वी शेअर केला होता. ज्यात ती समुद्र किनारी मस्ती करताना दिसली. तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

हेही वाचा :

Latest Post