×

पंजाबच्या कॅटरिना कैफने चालवली पंजाबच्या रस्त्यावर सायकल, लहान मुलांसोबतचा ‘हा’ मजेशीर व्हिडिओ पाहिलात का?

शहनाज गिल तिच्या बबली स्टाइलमुळे चाहत्यांची आवडती आहे. शहनाजची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, तर शहनाज देखील लोकांशी जोडण्याची एकही संधी सोडत नाही. काही काळापूर्वी शहनाज गिल तिच्या गावी गेली होती, तिथून अभिनेत्रीने अनेक मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यामध्ये ती तिच्या गावकऱ्यांसोबत मस्ती करताना दिसली. त्याच वेळी, आता शहनाजने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या गावात फेरफटका मारला आहे.

शहनाजने (shehnaaz gill) हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला शहनाज तिच्या गावातील लोकांमध्ये दिसत आहे. ती लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसोबत सेल्फी काढते. यानंतर शहनाज पंजाबच्या रस्त्यावर आईस्क्रीम सायकल चालवते आणि त्यानंतर अनेक मुलांना आईस्क्रीम खायला घालते. पंजाबच्या रस्त्यावर शहनाजची मस्ती इथेच संपत नाही.

व्हिडिओमध्ये शहनाज गिल मुलांना आईस्क्रीम दिल्यानंतर मुलींसोबत रस्त्यावर सायकल चालवत आहे. शहनाजने बऱ्याच दिवसांनी सायकल चालवल्याचे व्हिडिओ पाहून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर शेवटी ती काही लोकांसोबत गिधा करतानाही दिसते. शहनाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहनाजच्या या स्टाइलचे सगळेच कौतुक करत आहेत.

शहनाज गिलला शेवटचे बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत दिसले होते. शहनाज पंजाबी कुडी म्हणून येथे पोहोचली होती. सिल्व्हर कलरच्या सलवार सूटमध्ये शहनाज खूपच सुंदर दिसत होती. शहनाज आणि शाहरुख खानचे पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये शहनाज आणि शाहरुख खान मिठी मारून बोलतांना दिसत होते.

शहनाज ही बिग बॉस १३ नंतर खूप चर्चेत आली. या शोमध्ये तिची आणि सिद्धार्थ शुक्ल यांची मैत्री खूप गाजली होती. परंतु सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ती खूपच सदम्यात गेली होती

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post