Monday, July 1, 2024

चक्क इंग्रजी गाणे गाताना दिसली पंजाबची ‘कॅटरिना कैफ’, चाहत्यांनी घातली तोंडात बोटं

‘बिग बॉस १३’ फेम शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ‘बिग बॉस’ मधून तिला खास ओळख मिळाली होती. आपल्या निरागस अंदाजाने, तिने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली होती. शो संपल्यानंतरही ती सतत चर्चेचा विषय बनत असते. याशिवाय पंजाबची ‘कॅटरिना कैफ’ म्हणून ओळखली जाणारी शहनाज दरदिवशी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. सोशल मीडियावरही शहनाजचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. नुकताच शहनाजने इंग्रजी गाणे गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती जस्टीन बीबरचे गाणे गाताना दिसत आहे. शहनाजचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत शहनाज गिलने लिहिले, “घरी रहा आणि सुरक्षित रहा. मी एक नवीन छंद स्वीकारला आहे आणि जुन्यापेक्षा अधिक चांगले होत आहे. घरामध्ये राहून, अनेक प्रकारे आपण स्वतःचे मनोरंजन करू शकतो. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत.” तसेच, व्हिडिओमध्ये शहनाज म्हणते, “कोण म्हणाले मला इंग्रजी येत नाही, भलेही पंजाबी टच आहे. पण इंग्रजी ही इंग्रजीच असते. मग ती कोणत्याही भाषेत असो.”

शहनाजच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडल्याचे दिसून येत आहे. पोस्टवर कमेंट करून, चाहते तिच्या मेहनतीची प्रशंसा करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “आम्हाला माहित आहे बेबी गर्ल तू खूप मेहनत घेत आहेस. तू तुझ्या उणीवांवर काम करत आहेस आणि स्वतःचे सामर्थ्य वाढवित आहेस.” त्याच वेळी, दुसर्‍या युजरने लिहिले, “हे सना बेबी तुझी इंग्रजी परफेक्ट आहे.”

शहनाज गिलने अलीकडेच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून, चाहत्यांना एक खास संदेश दिला होता. फोटो शेअर करत शहनाजने लिहिले होते, “मला स्वतःवर प्रेम आहे. तुम्हीही स्वतःवर प्रेम करता का? जर होय, तर तुम्ही जेव्हा बाहेर जाल, तेव्हा मास्क घालून बाहेर जा.” या फोटोमध्ये शहनाजने काळ्या पँटसह, चंदेरी रंगाचे जॅकेट परिधान केलेले पाहायला मिळाले आणि यासोबतच तिने हायपोनी बांधली होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शहनाज गिल लवकरच ‘हौसला रख’ या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय, दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. याचे शूटिंग कॅनडामध्ये झाले आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शहनाज मुंबईत परतली आहे. तसेच, हा चित्रपट सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, ५ तासातच मिळाले ३६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-व्हिडिओ: अभिनेत्री सुष्मिताला कथ्थक डान्स शिकताना पाहिलंय का? अजूनही करतेय चाहत्यांना घायाळ

-लाखात एक! ए.आर. रहमानच्या गाण्यावर चिमुकलीने मिसळला आईच्या सुरात सूर; पाहा हा गोंडस व्हिडिओ

हे देखील वाचा