Saturday, August 2, 2025
Home अन्य सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्युनंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर शहनाझ गिलने तोडले मौन

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्युनंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर शहनाझ गिलने तोडले मौन

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत बिग बॉसच्या घरात शहनाझ गिलची मैत्री चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाझ खूप एकटी पडली होती. अशातच तिने त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक गाणे बनवले आहे, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. नुकताच तिचा ‘तू यही है’ हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला असून, हा व्हिडिओ पाहून त्यांचे सगळेच चाहते खूप भावनिक झाले आहेत. या व्हिडिओला पाच दिवसात २५ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाझ सोशल मीडियापासून दूर गेली होती. एवढंच काय तर तिने या काळात काही काम देखील केले नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी दिलजीत दोसांजसोबत ‘हौसला रख’ या गाण्याच्या प्रमोशनवेळी तिने तिच्या ब्रेकअपबद्दल मौन खोलले आहे आणि सत्य सांगितले आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाझची अवस्था बघून तिचे चाहते चिंता व्यक्त करत होते. तिच्याबाबत अनेक बातम्या पसरत होत्या. त्यामुळे तिने कामावर परत येण्याचा निर्णय घेतला. ‘हौसला रख’ या गाण्याच्या प्रमोशननंतर तिने अनेक मुलाखती दिल्या आहेत. (Shehnaaz gill speaks on rumours of her breakup says it will never happen)

Shehnaaz Gill And Sidharth Shukla
Photo Courtesy ScreenGrabYouTubeIndie Music Label

एका मुलाखतीत तिने तिच्या ब्रेकअपबद्दल पसरणाऱ्या अफवांबद्दल सांगितले. तिने सांगितले की, तिने जेव्हा तिच्याबाबत या अफवा ऐकल्या, तेव्हा तिला केवळ हसायला आले होते. त्या अफवा अशा होत्या की, शहनाझचे ब्रेकअप झाले आहे, जे कधी झालेच नव्हते. परंतु ती कधीही या गोष्टींकडे लक्ष देत नाही.

तिने ही गोष्ट स्पष्ट सांगितली होती की, तिला सिद्धार्थ आवडतो. परंतु सिद्धार्थ तिला नेहमीच एक चांगली मैत्रीण समजत होता. दोघांनीही त्यांचे रिलेशन असल्याचा स्वीकार केला नव्हता. त्या दोघांचे बॉडिंग इतके चांगले होते की, त्यांच्या चाहत्यांना ते प्रेम वाटायचे. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना सिडनाझ हे नाव दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा

तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा