Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ गेल्यानंतर भावनिक गाणं गाताना दिसली शेहनाझ; व्हिडिओ पाहून तुम्हालाही अनावर होतील अश्रू

एखादी खास व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून जाणं, हा खूप मोठा धक्का असतो. त्या व्यक्तीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण होते. अशी पोकळी जी आयुष्यभर जरी कोणी भरून काढण्याचा प्रयत्न केला, तरी देखील ते शक्य होणार नाही. जेव्हा ती व्यक्ती एखाद्याचे संपूर्ण जग असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या जाण्याने सोबतच्या व्यक्तीचे जगणे कठीण होऊन बसते. जी व्यक्ती एखाद्याला कायमचे सोडून जाते, तेव्हा काही उरलं आहे का मोठा प्रश्न पडतो. कारण तो आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नसतो. तो चेहरा कधीच दिसणार नसतो. सतत आपले डोळे त्या व्यक्तीला शोधत असतात.

असंच काहीसं सध्या शहनाझ गिलचं झाला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचं हसणं हे सर्व एका क्षणात तिच्या आयुष्यातून निघून गेले आहे. चाहते सिद्धार्थ आणि शहनाझच्या जोडीला ‘सिडनाझ’ म्हणत होते. सिद्धार्थ तिच्यासाठी फक्त एक मित्र नव्हता, तर तिचं संपूर्ण विश्व होता. हे विश्व खूप सुंदर आणि आनंदी होतं. मात्र नशिबाने वेगळाच डाव मांडला. तिच्याकडून तिचं जगच हिरावून घेतलं. एका क्षणात सर्व स्वप्ने उध्वस्त झाली. (shehnaaz gill throwback video goes viral after death of sidharth shukla shehnaaz sung with an emotional heart)

सिद्धार्थचे निधन होऊन २० दिवस झाले, तरीही शहनाझ यातून सावरली नाही. सिद्धार्थच्या निधनाने प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते, मात्र शहनाझ पूर्णपणे खचली आहे. अजूनही कोणीही तिचे रडणे विसरू शकले नाही आणि एकेकाळी हसणाऱ्या चेहऱ्यावर दुःख पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटले. सिद्धार्थ गेल्यापासून, शहनाझ कुठे आहे, ती कशी आहे, कोणत्या अवस्थेत हे कोणालाही माहित नाही. मात्र याच दरम्यान, शहनाझचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून प्रत्येकाला अश्रू अनावर होतील.

शहनाझ गिलच्या फॅन पेजवर एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात शहनाझ पंजाबी गाणे गात आहे. हे एक अतिशय भावनिक गाणे आहे आणि ती स्वतः ते गाताना भावूक झाली आहे. आता याला नशीब म्हणा किंवा आणखी काही… एकेकाळी हे गाणं म्हणणाऱ्या शहनाझला कुठे ठाऊक होतं की, एके दिवशी या गाण्याच्या ओळी तिच्या जीवनात खऱ्या ठरतील. याच कारणामुळे हा व्हिडिओ शेअर होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आज सिद्धार्थ शुक्ला आपल्यामध्ये नाही, मात्र त्याच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. जे चाहते कधीच सिद्धार्थला भेटले नाहीत, त्यांनासुद्धा त्याच्या जाण्याचे दु: ख सहन करता आले नाही. अशा परिस्थितीत शहनाझच्या दुःखाचा अंदाज घेता येतो. असे म्हणतात की, कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने आयुष्य थांबत नाही, ते फक्त जगण्याची पद्धत बदलते. सिद्धार्थ गेल्यानंतरही शहनाझचे आयुष्य थांबणार नाही, मात्र सिद्धार्थशिवाय शहनाझचे आयुष्य काय आहे? किंवा ती कशी जगेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

हे देखील वाचा